Yuvraj Singh | गोड बातमी ! युवराज सिंहच्या घरी पाळणा हलला, मुलगा झाल्याची ट्विटरवर दिली माहिती

| Updated on: Jan 26, 2022 | 7:06 AM

भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंहच्या (Yuvraj Singh) घरी पाळणा हलला आहे. पत्नी हेजल कीच (Hazel Keech) आणि युवराज सिंह आई-वडील झाले असून त्यांना पुत्रप्राप्ती झाली आहे. ही माहिती युवराज सिंगने ट्विटरवर दिलीय.

Yuvraj Singh | गोड बातमी ! युवराज सिंहच्या घरी पाळणा हलला, मुलगा झाल्याची ट्विटरवर दिली माहिती
yuvraj singh and hazel keech 2
Follow us on

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंहच्या (Yuvraj Singh) घरी पाळणा हलला आहे. पत्नी हेजल कीच (Hazel Keech) आणि युवराज सिंह आई-वडील झाले असून त्यांना पुत्रप्राप्ती झाली आहे. ही माहिती युवराज सिंगने ट्विटरवर दिलीय. मुलगा झाल्याने आनंद गगनात मावत नसल्याची प्रतिक्रिया युवराजने दिलीय. भारतीय क्रिकेट (Cricket) संघाचा भाग असताना युवराज सिंहने अनेक पराक्रम केलेले आहेत. सहा चेंडूमध्ये सहा षटकार लगावणारा खेळाडू म्हणूनदेखील युवराजची ओळख आहे.

युवराजने नेमकं काय सांगितलं आहे ?

मुलगा झाल्यामुळे युवराजला खूपच आनंद झालाय. त्याने ही गोड बातमी सर्वांसोबत शेअर केली आहे. तसा संदेश त्याने ट्विटरवर दिलाय. “माझे सर्व चाहते, परिवार तसेच मित्रांना मला ही बातमी सांगताना अत्यंत आनंद होत आहे. आम्हाला देवाने एका मुलाच्या रुपात आशीर्वाद दिला आहे. आम्ही आमच्या घरात एका छोड्या पाहुण्याचे स्वागत करत असून आमच्या खासगीपणाचा आदर करावा. लव्ह हेजल आणि युवराज,” असं युवराजने आपल्या संदेशात म्हटलं आहे.

युवराजच्या पत्नीने केलंय अनेक चित्रपटांत काम 

दरम्यान, 30 नोव्हेंबर 2016 रोजी युवराज सिंहने लग्न केले होते. युवराजची पत्नी हेजल कीचने आपल्या करिअरची सुरुवात एका जाहिरातीने केलेली आहे. तर सलमान खानच्या बॉडीगार्ड या चित्रपटात हेजलने अभिनेत्री म्हणून काम केलेले आहे. या चित्रपटात हेजलने करिना कपूरच्या मैत्रिणीची भूमिका केली होती. हेजलने आतापर्यंत मॅक्सिम, धर्मसंकट, बाँके आणि बाँके की क्रेझी बारात या चित्रपटात काम केलेले आहे. हेजलने हिंदी तसेच पंजाबी आणि तेलुगू चित्रपटातदेखील काम केलेले आहे. हेजलने बीग बॉसच्या सातव्या सिझनमध्ये भाग घेतला होता.

युवराजचे क्रिकेट करिअर 

दरम्यान, 39 वर्षाच्या युवराजने 10 जून 2019 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. युवराज सिंहने आतापर्यंत 304 एदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळलेले आहेत. या सामन्यांत त्याने 8701 धावा केलेल्या आहेत. युवराजने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 14 शतक तर 52 अर्धशतक केलेले आहेत. युवराजने 40 कसोटी सामन्यांत एकूण 1900 धावा केलेल्या असून यामध्ये 3 शतक तर 11 त्याच्या नावावर आहेत.

इतर बातम्या :

…तर यंदाचे IPL सामने दक्षिण आफ्रिकेत होणार, 20 फेब्रुवारीपर्यंत निर्णय

पाकिस्तान दौऱ्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाला धक्का, दोन दिग्गज खेळाडू संघाबाहेर होण्याची शक्यता

ICC Women’s Cricketer 2021: विराट-रोहितला जमलं नाही ते सांगलीच्या स्मृती मानधनाने करुन दाखवलं