ICC Women’s Cricketer 2021: विराट-रोहितला जमलं नाही ते सांगलीच्या स्मृती मानधनाने करुन दाखवलं

भारताची स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधनाला (Smriti Mandhana) आयसीसी महिला क्रिकेटर ऑफ द ईयर 2021 (ICC Women's Cricketer 2021) पुरस्कार जाहीर झाला आहे. या डावखुऱ्या फलंदाजासाठी 2021 हे वर्ष उत्कृष्ट ठरलं आहे. या वर्षात तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये खोऱ्याने धावा केल्या.

Jan 24, 2022 | 3:25 PM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अक्षय चोरगे

Jan 24, 2022 | 3:25 PM

भारताची स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधनाला (Smriti Mandhana) आयसीसी महिला क्रिकेटर ऑफ द ईयर 2021 (ICC Women's Cricketer 2021) पुरस्कार जाहीर झाला आहे. या डावखुऱ्या फलंदाजासाठी 2021 हे वर्ष उत्कृष्ट ठरलं आहे. या वर्षात तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये खोऱ्याने धावा केल्या. यासोबत महिला टी-20 लीग्समध्येदेखील तिने आपल्या बॅटची जादू दाखवली. वुमेन्स बिग बॅश लीग असो अथवा द हंड्रेड ही क्रिकेट लीग असो, स्मृती मानधनाने सर्वत्र अक्षरशः धुमाकूळ घातला. याचं श्रेय म्हणून तिचा ICC Women's Cricketer 2021 पुस्काराने गौरव केला जाणार आहे.

1 / 6
विशेष म्हणजे भारताचे पुरुष क्रिकेटपटू यावेळी पुरस्कारांसाठीच्या नामांकनात देखील दिसले नाहीत. 2021 या वर्षात एकही भारतीय पुरुष क्रिकेटपटू जागतिक क्रिकेटमध्ये लक्षवेधी कामगिरी करु शकलेला नाही. त्यामुळे आयसीसीच्या पुरस्कारांसाठी भारतीय पुरुष क्रिकेटपटू साधं नामांकनदेखील (रवीचंद्रन अश्विन वगळता) मिळवू शकले नाहीत. मात्र स्मृती मानधनाने भारताची झोळी रिकामी राहू दिली नाही. स्मृतीला महिला टी-20 क्रिकेटर ऑफ द ईयर पुरस्कारासाठीदेखील नामांकन मिळालं होतं.

2 / 6
 स्मृती मानधनाने 2021 मध्ये मोठी कामगिरी केली आहे. तिने या वर्षी 2 कसोटीत 61 च्या सरासरीने 244 धावा केल्या आणि डे-नाइट कसोटीत शतक झळकावणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली.

3 / 6
स्मृतीने यावर्षी 11 एकदिवसीय सामन्यांमध्ये 35.20 च्या सरासरीने 352 धावा केल्या आहेत. तिचा स्ट्राइक रेट 85 पेक्षा जास्त होता. यावर्षी तिने 2 अर्धशतके झळकावली. T-20 मध्ये, मानधनाने 9 T-20 डावांमध्ये 31 च्या सरासरीने 255 धावा केल्या ज्यात 2 अर्धशतकांचा समावेश आहे.

4 / 6
स्मृतीने तिच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत 62 एकदिवसीय सामन्यांमध्ये 4 शतकं आणि 19 अर्धशतकांच्या मदतीने 2377 धावा फटकावल्या आहेत. तर 84 टी-20 सामन्यांच्या 82 डावात तिने 1971 धावा लगावल्या आहेत. यात तिने 14 अर्धशतकं झळकावली आहेत. चार कसोटीत तिच्या नावावर एक शतक आणि दोन अर्धशतकं आहेत.

5 / 6
स्मृती मानधनाव्यतिरिक्त आयसीसी वुमेन्स क्रिकेटर ऑफ द ईयर पुरस्कारासाठी आयसीसीने टॅमी ब्यूमॉन्ट, लिजिली ली आणि गॅबी लुईस या तिघींना नामांकन दिलं होतं.

6 / 6

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें