Team India वर्ल्ड कपनंतर या संघाविरुद्ध टी 20 मालिका खेळणार, वेळापत्रक जाहीर

Indian Cricket Team | क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडिया टी 20 वर्ल्ड कपनंतर या टीम विरुद्ध टी 20 मालिका खेळणार आहे. मालिकेचं वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

Team India वर्ल्ड कपनंतर या संघाविरुद्ध टी 20 मालिका खेळणार, वेळापत्रक जाहीर
| Updated on: Feb 06, 2024 | 4:21 PM

मुंबई | टीम इंडिया सध्या इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. सध्या ही मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. मालिकेतील तिसरा सामना हा 25 ते 29 फेब्रुवारी दरम्यान राजकोट येथे खेळवण्यात येणार आहे. या मालिकेनंतर टीम इंडिया थेट आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. या टी 20 वर्ल्ड कपचं आयोजन हे वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत करण्यात आलं आहे. या दरम्यान क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे.

टीम इंडिया टी 20 वर्ल्ड कपनंतर झिंबाब्वे दौरा करणार आहे. झिंबाव्बे विरुद्ध टीम इंडिया यांच्यात 5 सामन्यांची टी 20 मालिका होणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. झिंबाब्वे क्रिकेटने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. या टी 20 मालिकेचं आयोजन जुलै महिन्यात करण्यात आलंय. मालिकेतील पाचही सामने हे हरारे क्रिकेट क्लब स्टेडियममध्ये होणार आहेत.

टीम इंडिया विरुद्ध झिंबाब्वे यांच्यात आतापर्यंत एकूण 3 टी 20 मालिका खेळवण्यात आल्या आहेत. टीम इंडियाने 2 सीरिज जिंकल्या आहेत. तर 1 मालिका बरोबरीत राहिली आहे. उभयसंघातील पहिली मालिका ही 2010 साली झाली. ती 2 सामन्यांची मालिका टीम इंडियाने 2-0 अशा फरकाने जिंकली. त्यानंतर 2015 मध्ये 2 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत राहिली. उभयसंघात 2016 मध्ये पार पडलेली 3 सामन्यांची मालिकेत टीम इंडिया 2-1 जिंकली. तर आता ही उभयसंघातील चौथी टी 20 मालिका असणार आहे.

टीम इंडियाच्या झिंबाब्वे दौऱ्याची घोषणा

झिंबाब्वे विरुद्ध टीम इंडिया टी 20 मालिकेचे वेळापत्रक

पहिला सामना, 6 जुलै

दुसरा सामना, 7 जुलै

तिसरा सामना, 10 जुलै

चौथा सामना, 13 जुलै

पाचवा सामना, 14 जुलै

“आम्ही टीम इंडिया विरुद्धच्या जुलै महिन्यात होणाऱ्या टी 20 मालिकेच्या ओयजनासाठी उत्सूक आहोत. टीम इंडियाच्या प्रभावामुळे क्रिकेटला मोठा फायजा झाला आहे. आम्ही बीसीसीआयचे आभारी आहोत.”, अशा शब्दात झिंबाब्वे क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष तवेंगवा मुकुहलानी यांनी बीसीसीआयचे आभार मानले.