मोठी बातमी! ख्रिस्तियानो रोनाल्डोचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा; 7 नंबरची जर्सीही सोडणार, 5 मिनिटांचा व्हिडिओ पोस्ट
फुटबॉल विश्वातील महान खेळाडूंपैकी एक असलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने पोर्तुगालकडून खेळण्याचा प्रवास संपवण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर भावनिक संदेश देत त्याने 23 वर्षांपासून अंगावर असलेली 7 नंबरची जर्सी पुढील पिढीकडे सोपवण्याची घोषणा केली. 234 सामने आणि 146 गोल अशी ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या रोनाल्डोचा हा त्याच्या निरोप चाहत्यांसाठी भावूक करणारा आहे.

पोर्तुगालचा दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने सर्वात मोठी घोषणा केली आहे. तब्बल पाच मिनिटांचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत त्याने केलेली घोषणा ही त्याच्या जगभरातल्या चाहत्यांसाठी धक्कादायक ठरली आहे. होय ज्याची भीती होती तेच घडलं आहे. रोनाल्डोने आता आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली आहे. यापुढे तो पोर्तुगालसाठी खेळताना दिसणार नाही. अलीकडील सामन्यांनंतर प्रचंड विचार केल्यानंतर त्याने पोर्तुगालच्या टीमच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे त्याच्या 23 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा अधिकृतपणे शेवट झाला आहे. पाच वेळा ‘बॅलन डी’ओर’ पुरस्कार जिंकणाऱ्या रोनाल्डोने राष्ट्रीय संघासोबतचा आपला प्रवास कायमचा थांबवला आहे. रोनाल्डोने सांगितले की, नोव्हेंबरमधील मोठ्या ब्रेकनंतर तो पोर्तुगालची त्याची नंबर 7ची जर्सी संघाला परत करणार आहे.
रोनाल्डोने 20 ऑगस्ट 2003 रोजी कझाकस्तानविरुद्धच्या सामन्यातून पोर्तुगालसाठी आपल्या फुटबॉल प्रवासाची सुरुवात केलेली, तेव्हा तो अवघ्या 18 वर्षांचा होता. गेल्या 23 वर्षांत त्याने आपल्या देशासाठी 234 सामने खेळले आहेत. यात त्याने 146 गोल नोंदवले आहेत, जे पोर्तुगालच्या इतिहासातील सर्वाधिक गोल आहेत. याव्यतिरिक्त त्याने 46 असिस्टही दिले आहेत. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत त्याने एकूण 985 गोल केले आहेत. आता क्लब फुटबॉलच्या माध्यमातून 1000 गोलचा टप्पा गाठण्याचे त्याने ध्येय ठेवले आहे.
रोनाल्डो 6 FIFA विश्वचषकांमध्ये खेळणारा पहिला खेळाडू
ख्रिस्तियानो रोनाल्डोने 2006 मध्ये जर्मनीत झालेल्या विश्वचषकातून पदार्पण केले. त्यानंतर तो 2010, 2014, 2018, 2022 आणि 2026 च्या विश्वचषक स्पर्धांमध्ये पोर्तुगीज संघाचा भाग राहिला. सलग सहा विश्वचषकांमध्ये सहभागी होण्याचा पराक्रम त्याने केला आणि सहा वेगवेगळ्या विश्वचषक स्पर्धांमध्ये गोल करणारा तो इतिहासातील एकमेव खेळाडू ठरला. रोनाल्डोने विश्वचषकात एकूण 11 गोल केले आहेत.
आपल्या विश्वचषक कारकिर्दीत त्याने एकूण 27 सामने खेळले आणि 11 गोल नोंदवले. यामध्ये 2026 च्या स्पर्धेत उझबेकिस्तानविरुद्ध केलेल्या गोलचाही समावेश आहे, ज्यामुळे हा विशेष विक्रम प्रस्थापित झाला. मात्र, इतकी शानदार कारकीर्द असूनही, त्याला कधीही विश्वचषक जिंकण्याची संधी मिळाली नाही. या कालावधीत पोर्तुगालची सर्वोत्तम कामगिरी 2006 मध्ये पाहायला मिळाली, जेव्हा संघ उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला आणि चौथ्या क्रमांकावर राहिलेला.
पोर्तुगीज फुटबॉलचा दिग्गज खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे मोठी घोषणा केली आहे. त्याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तो आता पुन्हा कधीही पोर्तुगालकडून खेळताना दिसणार नाही.