Gold Rate : 1 लाख रुपयांचा सोन्याचा दागिना 1 कोटी रुपयांचा कधी होणार, वाचा सविस्तर!
वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलच्या नोव्हेंबर 2026 च्या रिपोर्टनुसार सोन्याची मागणी साधारण 650 मेट्रिक टनने कमी झाली आहे. ही मागणी गेल्या सहा वर्षांच्या नीचांकी पातळीवर गेलीय.

Gold Rate Today : भारतात सोनं आणि चांदी या मौल्यवान धातूंना खूप महत्त्व आहे. सर्वात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जाते. दिवाळी सण तोंडावर आला आहे. या काळात धनत्रयोदशीच्या दिवशी तसेच दिवाळीच्या दिवशी लोक दागिन्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. यंदा दुष्काळ आहे. दुष्काळ पडल्यामुळे तसेच मान्सून समाधानकारक नसल्याने यंदा लोकांच्या हातात पैसा नाही. त्याचाच परिणाम म्हणून यंदा सोन्याच्या मागणीत घट झाली आहे. गेल्या काही दिवसांत सोन्याचा भावही घसरला आहे. अशा परिस्थितीत तुम्ही आता सोन्याची खरेदी केली तर भविष्यात तुम्ही करोडपती कधी व्हाल, ते जाणून घेऊ या…
वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलच्या नोव्हेंबर 2026 च्या रिपोर्टनुसार सोन्याची मागणी साधारण 650 मेट्रिक टनने कमी झाली आहे. ही मागणी गेल्या सहा वर्षांच्या नीचांकी पातळीवर गेलीय. इराणचे युद्ध, महागाई, कमजोर मान्सून याचा परिणाम म्हणून सोन्याची मागणी घटलीय, असं यामागचं कारण असल्याचं बोललं जातंय.
सध्या जागतिक पातळीवर अनिश्चितता निर्माण झालीय. असं असताना भारतीय रिझर्व्ह बँक मात्र सोन्यात गुंतवणूक करत आहे. याच परिस्थितीत तुम्ही साधारण एक लाखाचे सोने खरेदी केले तर त्याचे मूल्य एक कोटी रुपये होण्यासाठी किती काळ जावा लागेल ते पाहुया.
एखादी गुंतवणूक कधी म्हणजेच किती वर्षात दुप्पट होईल हे जाणून घ्यायचे असेल तर अर्थशास्त्रात 72 या आकड्याला व्यादराने भागले जाते. याच सूत्रानुसार सोन्यात गुंतवलेली रक्कम तुम्हाला 12 टक्क्यांनी रिटर्न्स मिळत असतील तर साधारण एक लाख रुपयांचे दोन लाख रुपये होण्यासाठी 6 वर्षे लागतील. हेच एक लाख रुपये 36 वर्षात 64 लाख रुपये होतील. याच गणनेनुसार 40 वर्षात एक लाख रुपयांचे 1.1 कोटी रुपये होतील.
दरम्यान, सोन्याचा भाव कधी वाडतो तर कधी कमी होतो. त्यामुळे वरील गणना ही सर्वकालिक आणि नेहमी खरी ठरेलच असे नाही. त्या-त्या काळातील महागाई दर, सोन्याचा भाव तसेच इतर गोष्टी सोन्याचे मूल्य किती वाढणार हे ठरवले जाते.
(टीप- या स्टोरीतून गुंतवणुकीचा सल्ला देण्यात आलेला नाही. गुंतवणूक करण्याचा निर्णय घेत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
