
मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना रंगला. या सामन्यात राजस्थाननं चेन्नईसमोर विजयासाठी 176 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान गाठण्यासाठी चेन्नईच्या सलामीच्या फलंदाजांना पॉवर प्लेमध्ये आक्रमक खेळी करता आली नाही. ऋतुराज गायकवाड स्वस्तात बाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणे मैदानात उतरला. मुंबई इडियन्स विरुद्ध त्याने आक्रमक खेळी करत संगाला विजय मिळवून दिला होता. या सामन्यातही त्याचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला. इतकंच काय तर अजिंक्य रहाणे आणि आर. अश्विनमध्ये ठसन पाहायला मिळाली.
आर. अश्विनने मंकडिंगच्या स्टाईलमध्ये गोलंदाजीची अॅक्शन केली मात्र चेंडू काही टाकला नाही. त्यानंतर पुन्हा गोलंदाजी करायला आर. अश्विन सरसावला तेव्हा त्याने तो चेंडू काही न करता सोडला आणि डेड केला. त्यानंतर दोघांनी एकमेकांकडे वेगळ्याच नजरेनं पाहिलं. अजिंक्य रहाणेनं लगेच दुसऱ्याच चेंडूवर उत्तुंग षटकार ठोकला.
Ashwin and rahane me kaleshh pic.twitter.com/1oMcReJH5K
— Aditya Verma ?? (@Adityaverma_12) April 12, 2023
Rahane in no mood to make a eye contact with Ash?? #CSKvRR pic.twitter.com/KeNzWLMVx0
— Basrani Dev (@MSDIAN___DEV) April 12, 2023
आर अश्विनने दुसऱ्याच षटकात अजिंक्य रहाणेची विकेट काढली. आर. अश्विनने आयपीएल इतिहासात पाचवेळा अजिंक्य रहाणेला बाद केलं आहे. अजिंक्य रहाणे 19 चेंडूत 31 धावा करून बाद झाला. त्यान 2 चौकार आणि 1 षटकार ठोकला.
प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल संघाने 176 धावांचं आव्हान चेन्नईला दिलं आहे. राजस्थानकडून जोस बटलर याने सर्वाधिक 52 धावांची खेळी केली. तर शेवटच्या काही ओव्हरमध्ये शिमरॉन हेटमायरनेही 30 धावांची छोटेखानी आक्रमक खेळी केली. चेन्नईकडून रविंंद्र जडेजा, आकाश सिंग आणि तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी 2 विकट्स घेतल्या. सीएसके महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्त्वाखाली 200 वा सामना खेळत आहे.
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन) : यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (w/c), देवदत्त पडिककल, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, कुलदीप सेन, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन) : डेव्हॉन कॉनवे, रुतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (w/c), सिसांडा मगला, महेश थेक्षाना, तुषार देशपांडे, आकाश सिंग