CWG 2022: PM Modi नी खेळाडूंमध्ये भरला जोश, दाखवून द्या, हा नवा हिंदुस्तान आहे

| Updated on: Jul 21, 2022 | 5:11 PM

कॉमनवेल्थ गेम्स (Commonwealth Games 2022) पुढच्या आठवड्यात सुरु होणार आहेत. यंदा इंग्लंडच्या बर्मिंघम शहरात या खेळांच आयोजन करण्यात आलं आहे.

CWG 2022: PM Modi नी खेळाडूंमध्ये भरला जोश, दाखवून द्या, हा नवा हिंदुस्तान आहे
Follow us on

मुंबई: कॉमनवेल्थ गेम्स (Commonwealth Games 2022) पुढच्या आठवड्यात सुरु होणार आहेत. यंदा इंग्लंडच्या बर्मिंघम शहरात या खेळांच आयोजन करण्यात आलं आहे. भारतीय खेळाडू कॉमनवेल्थ मध्ये यशाचा नवा अध्याय लिहिण्यासाठी सज्ज झाले आहेत. पंतप्रधान मोदींनी (PM Modi) कॉमनवेल्थ मध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या खेळाडूंमध्ये आज जोश भरला. त्यांच्यात नवीन आत्मविश्वास निर्माण केला. पंतप्रधान मोदींबरोबरच्या संवादानंतर खेळाडूंचा आत्मविश्वात टिपेला पोहोचला आहे. आता फक्त स्पर्धा सुरु होण्याची प्रतिक्षा आहे. भले देश इंग्रजांचा असेल, पण तिथे जलवा भारताचा दिसेल. कॉमनवेल्थ गेम्स मध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय खेळाडूंच पथक बर्मिंघम मध्ये दाखल झालं आहे. त्यांनी तिथल्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी सराव सुरु केलाय. पंतप्रधान मोदींनी सुरु केलेल्या परंपरेप्रमाणे आज खेळाडूंशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. कुठल्याही मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेआधी पंतप्रधान स्वत: खेळाडूंशी संवाद साधतात. टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेआधी सुद्धा मोदींनी अशाच प्रकारचा संवाद कार्यक्रम आयोजित केला होता.

हा नवीन हिंदुस्तान आहे

“हा नवीन हिंदुस्तान आहे. जगाला भारताची शक्ती दाखवून द्या” असं पंतप्रधान मोदी खेळाडूंना म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॉमनवेल्थ गेम्स मध्ये प्रथमच सहभागी होणाऱ्या 65 भारतीय खेळाडूंना खास संदेश दिला. “तुम्ही तुमची छाप उमटवणार हा मला विश्वास आहे. तुम्ही मनापासून जोरदार खेळा. पूर्ण क्षमतेने खेळा, कुठलही टेन्शन न घेता बिनधास्त खेळाचा आनंद घ्या” असं पतंप्रधान मोदी म्हणाले.

बर्मिंघम मध्ये एक मोठी संधी

भारतीय एथलीटसनी अलीकडच्या दिवसात दमदार प्रदर्शन केलय. त्या तयारीमुळे अपेक्षा निर्माण झाली आहे. गोल्ड कोस्ट ते बर्मिंघम पर्यंत बरचं काही बदललय. भारतीय खेळाडूंची प्रतिभा दिसून येतेय. कॉमनवेल्थ गेम्सच्या निमित्ताने कौशल्य सिद्ध करण्याची एक चांगली संधी आहे. यंदा पदकाच्या संख्येमध्ये एक नवा इतिहास रचण्याची भारताची इच्छा असेल.

215 एथलीटस होणार सहभागी

CWG 2022 बर्मिंघम मध्ये 28 जुलैपासून सुरु होत आहे. 8 ऑगस्टपर्यंत ही स्पर्धा चालेलं. एकूण 215 एथलीट 19 क्रीडा प्रकाराच्या 141 स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहेत. भारताने मागच्यावर्षी ऑस्ट्रेलियात गोल्ड कोस्ट येथे एकूण 66 पदक जिंकली होती. भारताने तिसरं स्थान मिळवलं होतं. यावेळी त्यापुढे जाण्याचा भारताचा प्रयत्न असेल. भारताने राष्ट्रकुल मध्ये आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी सन 2010 मध्ये दिल्लीत आयोजित स्पर्धेत केली होती. त्यावेळी भारताने 101 मेडल जिंकून दुसरं स्थान मिळवलं होतं.