CWG 2022: कॉमनवेल्थ गेम्स आधी स्वत: पंतप्रधान मोदी खेळाडूंशी बोलणार, त्यांचा उत्साह वाढवणार

मागच्यावर्षी जपानच्या टोक्यो शहरात ऑलिम्पिक (Tokyo olympics) स्पर्धेच आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर आता येत्या काही दिवसात कॉमन वेल्थच्या रुपाने दुसरी एक मोठी स्पर्धा होत आहे.

CWG 2022: कॉमनवेल्थ गेम्स आधी स्वत: पंतप्रधान मोदी खेळाडूंशी बोलणार, त्यांचा उत्साह वाढवणार
modi-neeraj chopra
Image Credit source: SAI
दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jul 21, 2022 | 5:13 PM

मुंबई: मागच्यावर्षी जपानच्या टोक्यो शहरात ऑलिम्पिक (Tokyo olympics) स्पर्धेच आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर आता येत्या काही दिवसात कॉमन वेल्थच्या रुपाने दुसरी एक मोठी स्पर्धा होत आहे. इंग्लंडच्या बर्मिंघम शहरात 28 जुलैपासून कॉमन वेल्थ स्पर्धा सुरु होणार आहे. CWG मध्ये भारताने नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. 8 ऑगस्ट पर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत भारतीय खेळाडू यंदा सुद्धा नक्कीच यशाचा नवीन अध्याय लिहितील. कॉमन वेल्थ मध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना पदक विजेती कामगिरी करण्यासाठी देशवासियांकडून प्रोत्साहन मिळणं गरजेचं आहे. त्यांचा उत्साह, हुरुप वाढवला पाहिजे. याची सुरुवात स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) बुधवारी 20 जुलैला CWG 2022 मध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय पथकासोबत चर्चा करणार आहेत. त्यांचा उत्साह वाढवणार आहेत.

 

खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हा संवाद होणार असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली. यात एथलीटसह त्यांचे कोचही सहभागी होणार आहेत. खेळाडूंचा उत्साह वाढवणं, त्यांना प्रेरणा देणं हा या संवादामागचा मुख्य हेतू आहे, असं PMO कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.

“अनेकदा पंतप्रधान मोदींनी स्वत: खेळाडूंना व्यक्तीगत फोन करुन यशासाठी तसेच त्यांच्या प्रमाणिक प्रयत्नांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अजून चांगली कामगिरी करण्यासाठी त्यांना प्रेरणा दिली आहे. त्याशिवाय भारतीय पथक मायदेशी परतल्यानंतर त्यांच्यासोबत चर्चा केली आहे” असं पीएमओकडून सांगण्यात आलं.

टोक्यो ऑलिम्पिक आधी सुद्धा चर्चा

पंतप्रधान मोदींची एथलीटसोबत चर्चा करण्याची ही पहिली वेळ नाही. टोक्यो ऑलिम्पिकआधी सुद्धा अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मागच्यावर्षी पंतप्रधान मोदींनी भारतीय एथलीटच्या पथकासह टोक्यो 2020 पॅराल्मिपक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंसोबतही चर्चा केली होती.

215 एथलीटस होणार सहभागी

CWG 2022 बर्मिंघम मध्ये 28 जुलैपासून सुरु होत आहे. 8 ऑगस्टपर्यंत ही स्पर्धा चालेलं. एकूण 215 एथलीट 19 क्रीडा प्रकाराच्या 141 स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहेत. भारताने मागच्यावर्षी ऑस्ट्रेलियात गोल्ड कोस्ट येथे एकूण 66 पदक जिंकली होती. भारताने तिसरं स्थान मिळवलं होतं. यावेळी त्यापुढे जाण्याचा भारताचा प्रयत्न असेल. भारताने राष्ट्रकुल मध्ये आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी सन 2010 मध्ये दिल्लीत आयोजित स्पर्धेत केली होती. त्यावेळी भारताने 101 मेडल जिंकून दुसरं स्थान मिळवलं होतं.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें