सुपर ओव्हरमध्ये निशामने सिक्सर ठोकला, शिष्याचा सिक्स पाहून गुरुचा हार्ट अटॅकने मृत्यू

| Updated on: Jul 18, 2019 | 4:02 PM

आयसीसी विश्वचषक 2019 च्या अंतिम सामन्यात सुपर ओव्हर खेळताना न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू जिम्मी नीशामने षटकार मारल्यानंतर प्रशिक्षक जेम्स गॉर्डन यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

सुपर ओव्हरमध्ये निशामने सिक्सर ठोकला, शिष्याचा सिक्स पाहून गुरुचा हार्ट अटॅकने मृत्यू
Follow us on

वेलिंग्टन (न्यूझीलंड) : आयसीसी विश्वचषक 2019 च्या अंतिम सामन्यात सुपर ओव्हर खेळताना न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू जिम्मी नीशामने षटकार मारल्यानंतर प्रशिक्षक जेम्स गॉर्डन यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. इंग्लंडने 14 जुलै रोजी अंतिम सामन्यात न्यूझीलंडला चौकारांच्या निकषाच्या आधारे मात दिली. यासह इंग्लंडने पहिल्यांदाच विश्वचषकावर नाव कोरले.

गॉर्डन नीशामचे ऑकलंड ग्रामर स्कुलचे माजी शिक्षक आणि प्रशिक्षक होते. त्यांची मुलगी लियोनी म्हणाली, “सुपर ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर नीशामने छक्का मारला तेव्हा बाबांच्या छातीचे ठोकेच बदलले. नर्सने तपासणी केली, मात्र त्यांना हार्ट अटॅक आल्याचे समजले. त्यानंतर बाबांचा मृत्यू झाला. नीशामने छक्का मारला आणि माझ्या बाबांनी शेवटचा श्वास घेतला.” गार्डन यांना नीशामने षटकार मारल्यानंतर खूप चांगले वाटले असेल, असंही त्यांच्या मुलीने नमूद केलं. तिने गार्डन यांचा सेंस ऑफ ह्यूमरही चांगलाच असल्याचे सांगितले.

नीशामने आज ट्विट केले, “डेव गॉर्डन माझ्या हायस्कुलचे शिक्षक, प्रशिक्षक आणि मित्र होते. या खेळाप्रति तुमचं प्रेम तुमच्या मार्गदर्शनाखाली खेळण्याचं भाग्य लाभलेल्या प्रत्येकात आलं आहे. सामना संपल्यानंतर तुम्ही तुमचा श्वास थांबवला. तुम्हाला नक्कीच अभिमान वाटला असणार. खूप खूप धन्यवाद. देव तुमच्या आत्म्याला शांती देवो.”

गॉर्डन यांची मुलगी लियोनीने वडिलांच्या मृत्यूनंतर नीशामने दिलेल्या आदरांजलीबद्दल आनंद व्यक्त केला. गॉर्डन यांनी नीशाम, लॉकी फर्ग्यूसन आणि अनेक खेळाडूंना हायस्कूलला असताना प्रशिक्षण दिले होते. ते 25 वर्षे शाळेचे क्रिकेट आणि हॉकीचे प्रशिक्षक होते.