मुलीची मृत्यूशी झुंज, तरीही पाक क्रिकेटर मैदानात, मुलीला वाचवण्यात अपयश

| Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM

नवी दिल्ली : पाकिस्तानचा फलंदाज आसिफ अली इंग्लंडमध्ये खेळत असतानाच त्याची 2 वर्षीय मुलगी नूर फातिमाचा कँसरने मृत्यू झाला. चिमुरड्या नूर फातिमाला कँसर झाला होता आणि तो चौथ्या टप्प्यात पोहचला होता. तिच्यावर अमेरिकेतील एका रुग्णालयात उपचार सुरु होते. मुलीच्या मृत्यूची बातमी समजताच आसिफ अली इंग्लंड दौरा सोडून मायदेशी परतला. पाकिस्तान सुपर लीगमधील आसिफ अलीची टीम इस्लामाबाद […]

मुलीची मृत्यूशी झुंज, तरीही पाक क्रिकेटर मैदानात, मुलीला वाचवण्यात अपयश
Follow us on

नवी दिल्ली : पाकिस्तानचा फलंदाज आसिफ अली इंग्लंडमध्ये खेळत असतानाच त्याची 2 वर्षीय मुलगी नूर फातिमाचा कँसरने मृत्यू झाला. चिमुरड्या नूर फातिमाला कँसर झाला होता आणि तो चौथ्या टप्प्यात पोहचला होता. तिच्यावर अमेरिकेतील एका रुग्णालयात उपचार सुरु होते. मुलीच्या मृत्यूची बातमी समजताच आसिफ अली इंग्लंड दौरा सोडून मायदेशी परतला.

पाकिस्तान सुपर लीगमधील आसिफ अलीची टीम इस्लामाबाद युनायटेडने (ISLU) रविवारी रात्री उशिरा आपल्या अधिकृत टि्वटरवरुन या बातमीला दुजोरा दिला. इस्लामाबाद यूनाइटेडने ट्वीटमध्ये म्हटले, ‘आसिफ अलीच्या मुलीच्या मृत्यूबाबत ISLU परिवार दुःख व्यक्त करत आहेत. आसिफ आणि त्यांच्या कुटुंबाप्रती आमच्या सहवेदना आहेत. आसिफ विश्वास आणि दृढनिश्चयाचे जबरदस्त उदाहरण आहे. तो आमच्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.’

मुलीच्या मृत्यूची बातमी येण्याआधी आसिफ रविवारी इंग्लंडविरोधातील 5 व्या वनडे मॅचमध्ये खेळत होता. त्याने या मॅचमध्ये 22 धावा काढल्या. पाकिस्तानचा संघ हा सामना 54 धावांनी हरला. 5 सामन्यांच्या मालिकेत अली सर्वच सामन्यांमध्ये खेळला. त्याने 2 अर्धशतकेही बनवली. मात्र, मालिकेत पाकिस्तानचा संघ 4-0 ने हरला.

इंग्लंड दौऱ्यावर येण्याआधी आसिफ अलीने आपल्या मुलीच्या कँसरविषयी एक ट्वीट केले होते. त्यात त्याने लिहिले होते, “माझी मुलगी चौथ्या स्टेजमधील कँसरशी झुंज देत आहे. आम्ही तिला उपचारासाठी अमेरिकेतील रुग्णालयात दाखल केले आहे. माझ्या मुलीसाठी तुम्ही सर्वजण प्रार्थना करा.”