AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अरे भावा, Whatsapp करायचं ना..; युजवेंद्र चहलला धनश्रीने सुनावलं, कोर्टात ढसाढसा रडली

कोर्टातील घटस्फोटाच्या सुनावणीनंतर युजवेंद्र चहलच्या टी-शर्टने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. त्यावर अखेर धनश्रीने मौन सोडलं आहे. त्याचसोबत कोर्टात घटस्फोटावर शिक्कामोर्तब होताच, काय घडलं, याविषयीही ती मोकळेपणे व्यक्त झाली.

अरे भावा, Whatsapp करायचं ना..; युजवेंद्र चहलला धनश्रीने सुनावलं, कोर्टात ढसाढसा रडली
धनश्री वर्मा, युजवेंद्र चहलImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 20, 2025 | 10:41 AM
Share

क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि कोरिओग्राफर-डान्सर धनश्री वर्मा यांचा घटस्फोट विविध कारणांमुळे सतत चर्चेत राहिला. या दोघांनी 2020 मध्ये लग्न केलं होतं. लग्नाच्या पाच वर्षांतच त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटाच्या शेवटच्या सुनावणीदरम्यान युजवेंद्रच्या टी-शर्टने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. ‘बी युअर ओन शुगर डॅडी’ (स्वत:चेच शुगर डॅडी बना) अशा मजकूराचा टी-शर्ट त्याने परिधान केला होता. काही दिवसांपूर्वी एका पॉडकास्टमध्ये चहलने खुलासा केला होता की, हा जगाला आणि पूर्व पत्नीला संदेश देण्याचा एक मार्ग होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत धनश्रीने त्यावर अखेर मौन सोडलं आहे.

‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ला दिलेल्या मुलाखतीत धनश्री तिच्या घटस्फोटाबद्दल आणि कोर्टातील त्या अखेरच्या सुनावणीबद्दल म्हणाली, “मला अजूनही आठवतंय की मी तिथे उभी होते आणि निकाल लागणार होता. मानसिकदृष्ट्या आमची तयारी होती, तरीही मी खूप भावूक झाली होती. मी तिथे सर्वांसमोर अक्षरश: रडत होती. त्यावेळी मला काय वाटत होतं, ते मी व्यक्तही करू शकत नव्हती. मला फक्त आठवतंय की मी रडत राहिले. मी रडतच होती.”

“सुनावणी पूर्ण झाल्यावर तो (चहल) आधी कोर्टातून बाहेर पडला. मी आतच होते आणि नंतर मागच्या दरवाजाने बाहेर पडले, कारण मला माध्यमांना सामोरं जायचं नव्हतं. मी कारमध्ये बसले आणि हुंदके आवरत होती. लोक तुमच्यावर टीका करतील, हे तुम्हाला माहीत असतं. हे सर्व समजण्याआधीच तो टी-शर्टचा स्टंट झाला. आपल्या सर्वांनाच ही गोष्ट खूप चांगल्या प्रकारे माहीत होती की त्यासाठी लोक मलाच दोष देतील. अरे भावा, व्हॉट्स अॅप करायचं होतं. टी-शर्ट घालायची काय गरज होती”, असा उपरोधिक सवाल तिने चहलला केला. “त्याक्षणी तिथे बसून मला जाणवलं होतं की, हे पूर्णपणे संपलंय, आता काहीच शिल्लक राहिलेलं नाही”, अशा शब्दांत धनश्री व्यक्त झाली.

चहलसोबतच्या घटस्फोटाबाबत धनश्री पुढे म्हणाली, “या सर्व गोष्टींसाठी मी का रडत होती? मग मी विचार केला की, जाऊ दे, संपवूया हे सगळं. त्या टी-शर्टच्या स्टंटने आणि त्या क्षणांनी मला हसण्याची आणि तिथून पुढे जाण्याची प्रेरणा दिली. सगळंच संपलं होतं.”

कोविड महामारीदरम्यान चहल धनश्रीकडून डान्सचे धडे घेत होता. तेव्हाच त्यांच्यात मैत्री झाली आणि हळूहळू त्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. लग्नाच्या दोन वर्षांतच त्यांच्या वैवाहिक आयुष्यात समस्या निर्माण झाल्या होत्या. जून 2022 पासून दोघं वेगवेगळे राहत होते. नंतर यावर्षी फेब्रुवारी महिन्यात त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला असता मार्चमध्ये ते अधिकृतरित्या विभक्त झाले.

Follow Us
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?