MS Dhoni : मंदिरा बेदीच्या प्रश्नाला धोनीनं दिलं धक्कादायक उत्तर, व्हिडिओ व्हायरल

विशेष म्हणजे महेंद्र सिंग धोनीचा आणखी एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

MS Dhoni : मंदिरा बेदीच्या प्रश्नाला धोनीनं दिलं धक्कादायक उत्तर, व्हिडिओ व्हायरल
ms dhoni
Image Credit source: twitter
| Updated on: Oct 07, 2022 | 10:11 AM

महेंद्रसिंग धोनी (Mahendrasingh Dhoni) त्याच्या चातुर्य बुद्धीमुळे अधिक प्रसिद्ध आहे. त्याने टीम इंडियाला (Team India)दोन्ही फॉरमॅटमधील विश्वचषक (T20 World Cup) जिंकून दिल्यामुळे त्याचे जगभरात चाहते आहेत. मागच्या काही दिवसांपासून तो सोशल मीडियात अधिक चर्चेत आहे. कारण त्याने विश्वचषक जिंकून दिला होता. त्यावेळची हेअरस्टाईल (Hairstyle) पुन्हा केली आहे. कालपासून त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

विशेष म्हणजे महेंद्र सिंग धोनीचा आणखी एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मंदिरा बेदीने धोनीची ज्यावेळी एक मुलाखत घेतली होती. त्यावेळी त्याला एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्याचं महेंद्रसिंग धोनीने खळबळजनक उत्तरं दिलं होतं.

धोनीला आत्तापर्यंत जगभरातून चांगलं क्रिकेट खेळल्यानंतर अनेक बक्षिसं मिळाली आहेत. त्यावर मंदिरा बेदी प्रश्न विचारते आणि म्हणते, की सगळ्यात चांगलं बक्षिस काय मिळालं आहे. त्यावर काही वेळ थांबतो आणि मुलगी असं म्हणतो. पण ही भेट नाही, यासाठी खुप परिश्रम घ्यावे लागले आहेत असं धोनी हसत सांगतोय.