MI vs RCB : LIVE मॅचमध्ये RCB च्या खेळाडूची दादागिरी, अंपायरला जुमानत नव्हता, मुंबई विरुद्ध सामन्यातील प्रकार VIDEO
MI vs RCB : काल मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामना झाला. या मॅचमध्ये आरसीबीच्या एका खेळाडूने दादागिरी केली. अंपायर सांगूनही तो ऐकत नव्हता. त्याच्यावर कारवाई होऊ शकते.

MI vs RCB : आयपीएल 2026 मध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. सलामीचा सामना जिंकून मुंबई इंडियन्सने चांगली सुरुवात केली होती. मुंबई इंडियन्सचा काल सलग तिसरा पराभव झाला. वानखेडे स्टेडियमवर रविवारी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मुंबईला हरवलं. या मॅचमध्ये अशी एक गोष्ट घडली त्यामुळे RCB चा स्टार टिम डेविडच्या डोक्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. टिम डेविडने असं काय केलं? RCB ने मुंबई इंडियन्सवर 18 धावांनी विजय मिळवला. टिम डेविडने 212 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने खेळताना 16 चेंडूत नाबाद 34 धावा केल्या. बंगळुरुने सामना जिंकला पण टिम डेविडला मॅच दरम्यान क्रिकेटचा नियम तोडण्याची शिक्षा मिळू शकते.
RCB ची इनिंग सुरु असताना 18 व्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर हे सर्व नाट्य घडलं. टिम डेविडने बॉलच्या शेप म्हणजे आकारावरुन प्रश्न विचारला. तो चेंडूची तपासणी करत होता. अंपायर त्याला असं करु नको म्हणून वारंवार टोकत होते. पण तो ऐकत नव्हता. अंपायरने त्याच्याकडून चेंडू मागितला पण त्यावर सुद्धा डेविड थांबला नाही. जबरदस्ती चेंडू चेक करत होता. टिम डेविडला या कृतीबद्दल अंपायरने सुनावलं.
Casual inspection from Tim David after absolute destruction 🔥🥶#IPLRivalryWeek 2026 👉 #MIvRCB | LIVE NOW 👉https://t.co/gLbf9ggQbu | #TATAIPL pic.twitter.com/OumaLMDlYF
— Star Sports (@StarSportsIndia) April 12, 2026
हा विषय एवढ्यावरच संपेल असं वाटत नाही
अंपायर त्याला ओरडले पण हा विषय एवढ्यावरच संपेल असं वाटत नाही. कारण बॉलच्या शेपची तपासणी करण्याचं काम खेळाडूचं नसतं. टिम डेविडने जे केलं, ज्या पद्धतीने केलं, जबरदस्ती स्वत:हून तो हे सर्व करत होता. त्यामुळे विषय अजून गंभीर होतो. इतकचं नाही हे सर्व करताना त्याने वेळ वाया घालवला. जे आयपीएलच्या कोड ऑफ कंडक्ट 2.10.7 चं उल्लंघन आहे. त्यामुळे टिम डेविडच्या या वर्तनाची अंपायर मॅच रेफरींकडे तक्रार करु शकतात. टिम डेविडला शिक्षा म्हणून दंड ठोठावला जाऊ शकतो.