भारत सहज जिंकतो कारण त्यांना पिच… पाकिस्तानी माजी क्रिकेटरनं केलेल्या आरोपामुळे तुम्हाला येईल राग
एजबॅस्टन येथे इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी, एका अनुभवी पाकिस्तानी क्रिकेटपटूने इंग्लंडवर खेळपट्टीबाबत भेदभाव केल्याचा आरोप केला आहे.

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील तिसरा कसोटी सामना लवकरच सुरू होणार आहे. इंग्लंड आणि पाकिस्तान ९ सप्टेंबर रोजी बर्मिंगहॅममधील एडजबॅस्टन येथे मालिकेतील अंतिम कसोटी सामन्यात आमने-सामने येतील. हा या महिन्यातील एकमेव कसोटी सामना असेल. मात्र, त्याआधीच इंग्लंडच्या खेळपट्टीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
इंग्लंडवर खेळपट्टी घोटाळ्याचा आरोप झाला आहे. एका दिग्गज पाकिस्तानी क्रिकेटपटूने इंग्लंडवर हा गंभीर आरोप केला आहे. इंग्लंड भेदभाव करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू बाझिद खान यांनी इंग्लंडवर खेळपट्टी घोटाळे आणि भेदभावाचा आरोप केला आहे.
ते म्हणाले की, इंग्लंड भारतासाठी कसोटी सामन्यांमध्ये सपाट खेळपट्ट्या तयार करते, परंतु पाकिस्तान आणि इतर संघांसाठी कठीण खेळपट्ट्या तयार करते. इंग्लंड असे करण्यामागे व्यावसायिक कारण आहे.
"भारतासोबतचे कसोटी सामने पाच दिवस चालतात. तर, पाकिस्तान आणि इतर संघांसोबतच्या सामन्यांचा निकाल तिसऱ्या दिवसापर्यंत लागतो. याचे कारण असे की, इंग्लंड भारताविरुद्ध इतर संघांपेक्षा सपाट खेळपट्ट्यांवर खेळते." असे ते म्हणाले.
बाजिद खान यांनी खेळपट्टी घोटाळा आणि भारत व इतर संघांसोबत होणाऱ्या भेदभावाच्या केलेल्या आरोपांवर इंग्लंडकडून अद्याप कोणतेही निवेदन आलेले नाही.