
इंग्लंडविरोधातील पाच कसोटी सामन्याच्या मालिकेसाठी भारत यजमान देशात आहे. पहिल्या सामन्यात भारतीय टीमने जोरदार सुरूवात केली. सामन्यापूर्वीच्या पहिल्या दिवशी कर्णधार शुभमन गिल आणि यशस्वी जायसवाल यांनी शानदार शतक ठोकले. या शतकाच्या जोरावर टीम इंडियाने 300 धावांचा डोंगर उभारला. शुभमन गिल याच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याच्यावर इंटरनॅशनल क्रिकेट काऊंसिल (ICC) मोठी कारवाई करू शकते. कारण गिल याने ICC चा एक मोठा नियम तोडल्याचे समोर आले आहे. त्याला मोठा दंड बसण्याची शक्यता आहे.
गिलने कोणता तोडला नियम?
टीम इंडियाचा नवीन कर्णधार शुभमन गिल याने हेडिंग्ले कसोटीत जोरदार शतक ठोकले. पण या दरम्यान त्याने एक चूक केली. तो जेव्हा फलंदाजीला उतरला तेव्हा त्याने पांढरे मोजे (Socks) न घालता काळे मोजे घातले आहे. क्रिकेट कसोटीत पांढरे मोजे घालण्याचा नियम आहे. हा नियम मॅरीलेबोन क्रिकेट क्लबच्या (MCC) शिफारशींवर लागू करण्यात आला आहे. तो क्रिकेटचे नियम निर्धारीत करतो. आता गिल यांना ड्रेस कोड नियमांचे उल्लंघन करण्यासाठी ICC च्या कारवाईचा सामना करावा लागू शकतो. स्काय स्पोर्ट्सने गिलच्या प्रकरणात एक ट्वीट पण केले आहे.
काळ्या मोज्याविषयी काय आहे तो नियम?
कपड्यांविषयी ICC च्या नियम क्रमांक 19.45 मध्ये सांगण्यात आले आहे. एक खेळाडू कसोटी सामन्यात पांढरा ड्रेस, क्रीम , पायात हलके तपकिरी मोजे अथवा पांढरे मोजे घालावे. पण शुभमन गिल याने काळे मोजे घातले होते. हा ICC नियमांचा भंग आहे. हा नियम मे 2023 मध्ये लागू करण्यात आला होता.
गिलला दंडाचा फटका?
गिल याला दंड लावावा की नाही याचा निर्णय मॅच रेफरी करतील. हेडिंग्ले कसोटी सामन्याचे रेफरी रिची रिचर्डसन यांनी याप्रकरणात लक्ष घातल्यास शुभमन गिल याला दंड लागू शकतो. त्याला दंडात जवळपास 10 ते 20% रक्कम द्यावी लागू शकते. अर्थात गिल याची बाजू ऐकून घेण्यात आल्यानंतर हा निर्णय होऊ शकतो. पांढरे मोजे ओले होते अथवा दुसरे ठोस कारण दिल्यास मॅच रेफरी योग्य निर्णय घेऊ शकतो.