Ben Stokes refused to handshake truth : बेन स्टोक्सने जडेजा आणि सुंदरशी हँडशेक न केल्याच्या Videoची पोलखोल, काय आहे सत्य ?

Ben Stokes refused to handshake truth : बेन स्टोक्सच्या व्हायरल व्हिडिओचे सत्य आता उघड झाले आहे. खरंतर, व्हायरल व्हिडिओमध्ये जे दिसतंय, ते सत्य नाहीय. मग नक्की काय आहे प्रकरण ?

Ben Stokes refused to handshake truth : बेन स्टोक्सने जडेजा आणि सुंदरशी हँडशेक न केल्याच्या Videoची पोलखोल, काय आहे सत्य ?
बेन स्टोक्सच्या व्हायरल Videoचं सत्य काय ?
Image Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: Jul 28, 2025 | 11:37 AM

Ben Stokes refused to handshake truth : मँचेस्टर येथील कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओमध्ये बेन स्टोक्स हा रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्याशी हस्तांदोलन करत नसल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ पिच एरिआचा आहे, जिथे स्टोक्सने त्याच्या टीमच्याइतर खेळांडूशी हस्तांदोलन तर केलं पण भारतीय फलंदाज रवीद्र जडेजा आणि वॉशिंगटन सुंदर, हे दोघे समोर आल्यानंतर त्यांच्याशी हात मिळवण्यास नकार दिला. पण हा व्हिडीओ खरंच किती खरा आहे ? असा सवाल सध्या उपस्थित होत आहे. व्हिडिओमध्ये जे दिसतंय ते सत्य आहे की दुसरी काही कथा आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत. सोप्या शब्दांत सांगायचे तर, बेन स्टोक्सचा हस्तांदोलन न करण्याचा व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ पोलखोल झाली आहे.

बेन स्टोक्स चा व्हायरल Video

जो व्हिडीओ व्हायरल झालाय तो कथेचा दुसरा भाग आहे. म्हणजेच, बेन स्टोक्सने रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्याशी हस्तांदोलन केल्यानंतरचा हा व्हिडिओ आहे.

 

हे आहे VIDEO चं संपूर्ण सत्य

या व्हायरल व्हिडिओच्या आधीच्या व्हिडिओमध्ये इंग्लंडचा कर्णधार हा जडेजा आणि वॉशिंगटन सुंदरशी हस्तांदोलन करताना स्पष्टपणे दिसतोय. बेन स्टोक्स प्रथम जडेजाशी हस्तांदोलन करतो, नंतर सुंदरशी हस्तांदोलन करतो. आता एकदा हँडशेक केल्यावर पुन्हा दुसऱ्यांदा हस्तांदोलन करण्यात काही अर्थ नसतो. आणि त्यामुळेच आता व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये तो त्या दोघांशी हस्तांदोलन करताना दिसत नाही.

 

बेन स्टोक्सनेही जडेजा आणि सुंदरच्या फलंदाजीचे केलं कौतुक

तसंही जर बेन स्टोक्सला रवींद्र जडेजा किंवा वॉशिंग्टन सुंदर यांच्याबद्दल राग असता, तर त्याने पत्रकार परिषदेत त्यांचं कौतुक का केलं असतं ? रंवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी ज्या पद्धतीने फलंदाजी केली ती कौतुकास्पद आहे, असं स्टोक्सने पत्रकार परिषदेत म्हटलं होतं.

रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर दोघांनीही मँचेस्टर कसोटीत शतके झळकावली. रवींद्र जडेजाने 185 चेंडूत नाबाद 107 धावा केल्या. तर वॉशिंग्टन सुंदरने 206 चेंडूंचा सामना करत नाबाद 101 धावा केल्या. भारतासाठी मँचेस्टर कसोटी अनिर्णित ठेवण्यात दोघांनीही अद्भुत भूमिका बजावली.