Maharashtra Kesari : पहिलीच महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा वादात, दीपाली सय्यद यांच्या दाव्यामुळे वादंग

| Updated on: Mar 20, 2023 | 3:09 PM

Maharashtra Kesari : महाराष्ट्रात पहिल्यांदाच महिलांसाठी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच आयोजन करण्यात येणार आहे. पण कोणाची स्पर्धा अधिकृत यावरुन वाद निर्माण झाला आहे. यावरुन कोर्ट कचेरी सुद्धा सुरु आहे.

Maharashtra Kesari : पहिलीच महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा वादात, दीपाली सय्यद यांच्या दाव्यामुळे वादंग
deepali sayyed
Image Credit source: instagram
Follow us on

कोल्हापूर : पहिलीच महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. एकूण तीन ठिकाणी महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेच आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणाची महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा अधिकृत हा प्रश्न निर्माण झालाय. तिन्ही आयोजक आमचीच महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा अधिकृत असल्याचा दावा करतायत. त्यामुळे हा प्रश्न निर्माण झालाय. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी 23-24 मार्चला सांगलीमध्ये महिला कुस्ती स्पर्धेच आयोजन केलं आहे.

राज्य कुस्तीगीर स्पर्धेच्या मान्यतेने ही स्पर्धा होत असल्याा बाळासाहेब लांडगे यांचा दावा आहे. सांगलीत होत असलेली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा अधिकृत असल्याच त्यांच म्हणणं आहे. त्यासाठी त्यांनी कोर्टात धाव घेतलीय.

अजून कुठे होणार कुस्ती स्पर्धा?

भारतीय कुस्ती परिषदेच्या अस्थाई समितीने एक ते सात एप्रिल दरम्यान पुण्यात महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होत असल्याची घोषणा केलीय.

दीपाली सय्यद काय म्हणाल्या?
दरम्यान आता राजकारणात सक्रीय असलेल्या अभिनेत्री दिपाली सय्यद भोसले यांनी कोल्हापुरात होणारी महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा हीचं शासनाची अधिकृत स्पर्धा असल्याच म्हटलय. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात कोल्हापूरात महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार आहे.

दिपाली सय्यद यांच्या दाव्यामुळे कुस्ती क्षेत्रात वादंग निर्माण होणार आहे. दरम्यान कोणाची महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा अधिकृत असा प्रश्न कुस्तीगीर आणि कुस्तीशौकीनांना पडला आहे.