India Tour Australia | कारकिर्दीच्या अखेरीस जसप्रीत बुमराह तीनही प्रकारातील सर्वोत्कृष्ठ गोलंदाज असेल : जेसन गिलेस्पी

| Updated on: Nov 13, 2020 | 9:24 PM

टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय, टी 20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे.

India Tour Australia | कारकिर्दीच्या अखेरीस जसप्रीत बुमराह तीनही प्रकारातील सर्वोत्कृष्ठ गोलंदाज असेल : जेसन गिलेस्पी
Follow us on

मेलबर्न : टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सिडनीमध्ये दाखल झाली आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या दौऱ्यात एकदिवसीय, टी 20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एकदिवसीय आणि कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला होता. टीम इंडियाचे सर्वच खेळाडू चांगलेच फॉर्मात आहे. टीम इंडियाचा यॉर्करकिंग जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केली. त्यामुळे बुमराहदेखील चांगली कामगिरी करतोय. या दौऱ्याच्या सुरुवातीआधी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेसन गिलेस्पीने (Jason Gillespie) टीम इंडियाच्या गोलंदाजांचं कौतुक केलं. तसेच जसप्रीत बुमराहचेही कौतुक केलं आहे. Former Australia bowler Jason Gillespie has said that Jaspreet Bumrah will be the best bowler of all three types of cricket

गिलस्पी काय म्हणाला?

“जसप्रीत फार गुणवान गोलंदाज आहे. बुमराह त्याच्या किक्रेट कारकिर्दीतील शेवटच्या टप्प्यात असेल तोवर टीम इंडियाच्या तीन्ही प्रकारातील यशस्वी गोलंदाज झालेला असेल, यात काहीच शंका नाही, असं गिलस्पी म्हणाला. गिलस्पी स्टार स्पोर्ट्स सोबत एका विशेष कार्यक्रमात बोलत होता. गिलेस्पीने टीम इंडियाच्या गोलंदाजांच कौतुक केलं. तसेच गिलस्पीने इशांत शर्मा आणि मोहम्मद शमीबद्दलही वक्तव्य केलं. इशांत नेहमीच आपल्या गोलंदाजी चांगले बदल करतो. तो नेहमीच नावीण्यपूर्ण करण्याचं प्रयत्न करतो. इशांत कोणत्याही परिस्थितीशी लवकर जुळवून घेतो, असं गिलेस्पी इशांत बद्दल म्हणाला.

मालिका कोण जिंकणार ?

ज्या संघाचे गोलंदाज खेळपट्टीवर अचूक टप्पा टाकतील आणि चांगली कामगिरी करतील तो संघ जिंकेल, अशी प्रतिक्रिया जेसनने मालिका कोण जिंकणार असा प्रश्न विचारल्यावर दिली. ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या भारतीय खेळपट्ट्यांच्या तुलनेत वेगळ्या आहेत. भारतीय गोलंदाजांना मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा अनुभव आहे. त्यामुळे यावेळेस त्यांना या अनुभवाचा फायदा होईल. बुमराह, शमी सारखे वेगवान गोलंदाज डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ डोकेदुखी ठरु शकतात, असंही गिलेस्पीने नमूद केलं.

दरम्यान टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला एकदिवसीय मालिकेपासून सुरुवात होत आहे. या एकदिवसीय मालिकेची सुरुवात 17 नोव्हेंबरपासून होत आहे. या एकदिवसीय मालिकेत एकूण 4 सामने खेळण्यात येणार आहेत. त्यानंतर 3 टी सामन्यांची मालिका खेळण्यात येणार आहे. टी 20 नंतर 4 टेस्ट मॅचची सीरिज खेळण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या :

INDIA TOUR AUSTRALIA | टीम इंडियाविरुद्धच्या वनडे आणि टी 20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया टीमची घोषणा

India Tour of Australia | कसोटी मालिकेदरम्यान या कारणामुळे कर्णधार कोहली मायदेशी परतणार

India Tour Australia | ठरलं! अखेर हिटमॅन रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार, पण….

Former Australia bowler Jason Gillespie has said that Jaspreet Bumrah will be the best bowler of all three types of cricket