बीसीसीआयने धोनीचं नाव करार यादीतून वगळलं, C ग्रेडमध्येही नाव नाही!

| Updated on: Jan 16, 2020 | 2:34 PM

ए प्लस करारबद्ध यादीत कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा आणि गोलंदाज जसप्रीत बुमराहचा समावेश आहे. ए प्लस, ए, बी आणि सी अशा चार श्रेणीत भारतीय खेळाडूंशी करार करण्यात येतो. मात्र धोनीचं नाव या कोणत्याच श्रेणीत नाही.

बीसीसीआयने धोनीचं नाव करार यादीतून वगळलं, C ग्रेडमध्येही नाव नाही!
Follow us on

मुंबई : बीसीसीआयने वार्षिक कराराच्या यादीतून टीम इंडियाचा माजी कर्णधार एम एस धोनीचं (M S Dhoni dropped from BCCI’s list) नाव वगळलं आहे. बीसीसीआयने गुरुवारी भारतीय खेळाडूंच्या वार्षिक कराराची  यादी जाहीर केली. ऑक्टोबर 2019 ते सप्टेंबर 2020 या काळासाठी करण्यात आलेल्या करारबद्ध खेळाडूंच्या यादीत महेंद्रसिंह धोनीचं (M S Dhoni dropped from BCCI’s list) नाव नाही.

ए प्लस करारबद्ध यादीत कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा आणि गोलंदाज जसप्रीत बुमराहचा समावेश आहे. ए प्लस, ए, बी आणि सी अशा चार श्रेणीत भारतीय खेळाडूंशी करार करण्यात येतो. मात्र धोनीचं नाव या कोणत्याच श्रेणीत नाही.

नवदीप सैनी, मयांक अग्रवाल, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर या युवा क्रिकेटपटूंचा वार्षिक करार यादीत समावेश करण्यात आला आहे.

कोणाला किती रक्कम मिळणार
ए+ ग्रेड – 7 कोटी
ए ग्रेड – 5 कोटी
बी ग्रेड – 3 कोटी
सी ग्रेड – 1 कोटी

ए + ग्रेड – विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह

ए ग्रेड – रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल, शिखर धवन,  मोहम्मद शमी, इशांत शर्मा, कुलदीप यादव, रिषभ पंत

बी ग्रेड – वृद्धीमान साहा, उमेश यादव, युजवेंद्र चहल, हार्दिक पांड्या, मयांक अग्रवाल

सी ग्रेड – केदार जाधव, नवदीप सैनी, दीपक चहर, मनिष पांडे, हनुमा विहारी, शार्दूल ठाकूर, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर