IND vs SL 2nd Test : गौतम गंभीरला तुम्ही कितीही शिव्या घाला पण एकाबाबतीत तो 1 नंबर, कोलंबो टेस्टमध्ये एक निर्णय ठरला मास्टरस्ट्रोक

IND vs SL 2nd Test : क्रिकेट फॅन्स सोशल मीडियावर गंभीर यांना ट्रोल करतात. त्यांना वाईट-साईट बोलतात. पण एक गोष्ट मान्य करावी लागेल, गंभीरला तुम्ही काहीही बोला. पण एकाबाबतीत तो एक नंबर आहे, त्याला तोड नाहीय.

IND vs SL 2nd Test : गौतम गंभीरला तुम्ही कितीही शिव्या घाला पण एकाबाबतीत तो 1 नंबर, कोलंबो टेस्टमध्ये एक निर्णय ठरला मास्टरस्ट्रोक
gautam gambhir
Image Credit source: PTI
| Updated on: Aug 26, 2026 | 3:44 PM

टीम इंडियाचे हेड कोच गौतम गंभीर आपल्या निर्णयांमुळे चर्चेत असतात. अनेकदा त्यांच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं. क्रिकेट फॅन्स सोशल मीडियावर गंभीर यांना ट्रोल करतात. त्यांना वाईट-साईट बोलतात. पण एक गोष्ट मान्य करावी लागेल, गंभीरला तुम्ही काहीही बोला. त्याच्या निर्णयावर कितीही प्रश्नचिन्ह उपस्थि करा. पण तो एक नंबर प्लान बनवतो. गंभीरचा प्लान म्हणजे त्याने घेतलेले निर्णय. त्या निर्णयांवरुन वादविवाद जरुर होतात. पण त्याचे निर्णय टीम इंडियासाठी योग्य ठरतात. आता कोलंबो टेस्टचचं घ्या. हेड कोच गौतम गंभीरने कुलदीप यादवला बाहेर बसवून सारांश जैनचा डेब्यू करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावर प्रश्न उपस्थित झाले. कुलदीपला बाहेर का बसवतात? हा प्रश्न होता. आता कोलंबो टेस्टमध्ये सारांश जैनला खेळवण्याचा गंभीरचा निर्णय किती योग्य होता? ते सिद्ध झालय.

कुलदीप यादवने फिरकीला अनुकूल असलेल्या गॉलच्या पीचवर पहिल्या टेस्टमध्ये फक्त एक विकेट घेतलेला. पण सारांश जैनने कोलंबो टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये 2 विकेट घेतले. या दोन विकेटमध्ये सोनल दिनुषाचा एक विकेट आहे. या सोनलने कसोटी मालिकेत धावांचा सपाटा लावला आहे. सारांश जैनने चौथ्या दिवशी नव्या चेंडूने सोनला दिनुषाचा विकेट घेतला. त्यामुळे श्रीलंकेला फॉलोऑन टाळता आला नाही.

गंभीरचा निर्णय किती योग्य होता, हे यातून दिसलं

कुलदीपच्या जागी सारांश जैनला खेळवण्याचा गंभीरचा निर्णय किती योग्य होता, हे यातून दिसून आलं. गंभीरच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची ही पहिली वेळ नाहीय. मैदानात त्याचे निर्णय योग्य ठरले आहेत. याआधी प्रसिद्ध कृष्णाला सतत संधी देण्याच्या निर्णयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेलं. पण मागच्या कोलंबो कसोटीच्या पहिल्या डावात प्रसिद्ध कृष्णाने भारतासाठी जबरदस्त गोलंदाजी केली. त्याने 16 ओव्हरमध्ये 52 धावा देऊन तीन विकेट काढले.

ट्रोलिंग कमी झालय

प्रसिद्ध कृष्णासारखच गौतम गंभीर वनडे, टी 20 फॉर्मेटमध्ये हर्षित राणाला बॅक करतो. हर्षित राणाला पाठिंबा दिल्याबद्दल त्याला बरच ऐकावं सुद्धा लागलय. पण हर्षित राणाने कधी बॅटने, तर कधी बॉलने व्हाइट बॉल गेममध्ये महत्वपूर्ण योगदान दिलय. तो मर्यादीत षटकांच्या मॅचमध्ये 8 व्या नंबरवर उतरतो. भारताच्या फलंदाजीला मजबुती मिळते. हर्षित राणाने दमदार प्रदर्शन केलय. त्याच्या चांगल्या कामगिरीमुळे गंभीरच ट्रोलिंग कमी झालय.

 

Follow Us