दिल्लीच्या रणजी संघाच्या कर्णधारपदावरुन गंभीर पायउतार

| Updated on: Jul 05, 2019 | 5:03 PM

नवी दिल्ली : क्रिकेटर गौतम गंभीरने दिल्लीच्या रणजी क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडवरुन राजीनाम्यासंदर्भात गंभीरने माहिती घोषणा केली. कर्णधारपदाची जबाबदारी तरुण खेळाडूला मिळावी म्हणून पदाचा राजीनामा देत असल्याच्या भावना गंभीरने व्यक्त केल्या. दिल्ली क्रिकेट बोर्डाने गौतम गंभीरच्या जागी नितेश राणाची निवड केली आहे. नितीश राणा आता दिल्लीच्या रणजी संघाचा कर्णधार असेल. “दिल्लीच्या […]

दिल्लीच्या रणजी संघाच्या कर्णधारपदावरुन गंभीर पायउतार
Follow us on

नवी दिल्ली : क्रिकेटर गौतम गंभीरने दिल्लीच्या रणजी क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडवरुन राजीनाम्यासंदर्भात गंभीरने माहिती घोषणा केली. कर्णधारपदाची जबाबदारी तरुण खेळाडूला मिळावी म्हणून पदाचा राजीनामा देत असल्याच्या भावना गंभीरने व्यक्त केल्या. दिल्ली क्रिकेट बोर्डाने गौतम गंभीरच्या जागी नितेश राणाची निवड केली आहे. नितीश राणा आता दिल्लीच्या रणजी संघाचा कर्णधार असेल.

“दिल्लीच्या रणजी संघाचे नेतृत्त्व युवा खेळाडूला मिळावं, यासाठी मी कर्णधारपदाचा राजीनामा देत असून, दिल्ली क्रिकेट बोर्डाला आवाहन करतो की, कर्णधार म्हणून माझा विचार न करता संघाचा सदस्य म्हणून माझा विचार करावा.’’ असे ट्वीट गौतम गंभीरने केले आहे.

गौतम गंभीरने राजीनामा देण्याआधी निवड समितीचे वरिष्ठ अधिकारी अमित भंडारी यांना कर्णधारपदाच्या राजीनामा देणार असल्याचे वृत्त सांगितले होते. त्यामुळे गंभीरने हा निर्णय विचारपूर्वक घेतल्याचे स्पष्टीकरण दिल्ली क्रिकेट संघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलं आहे.

दिल्ली पहिला रणजी सामना 12 नोव्हेंबरला फिरोजशाह कोटला मैदानावर खेळणार आहे. हे रणजी सत्र सुरु होण्याआधी गंभीरची कर्णधारपदावर निवड करण्यात आली होती. दरम्यान, गंभीरच्या नेतृत्वात दिल्लीने विजय हजारे चषकात फायनल गाठली होती. या विजय हजारे चषकात गंभीरने 500 धावा ठोकल्या होत्या.