Goa: ग्रासरूट्स ते एलिट बॅडमिंटन इकोसिस्टम विकसित होणार, गोवा बॅडमिंटन असोसिएशन आणि पदुकोण स्कूल ऑफ बॅडमिंटन सोबत काम करणार

गोवा बॅडमिंटन असोसिएशनने (GBA) राज्यात ग्रासरूट्स ते एलिट बॅडमिंटन इकोसिस्टम तयार करण्यासाठी पदुकोण स्कूल ऑफ बॅडमिंटन (PSB) सोबत सहकार्याची घोषणा केली. यावेळी पदुकोण स्कूल ऑफ बॅडमिंटनचे तांत्रिक संचालक श्री. टी. बालन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Goa: ग्रासरूट्स ते एलिट बॅडमिंटन इकोसिस्टम विकसित होणार, गोवा बॅडमिंटन असोसिएशन आणि पदुकोण स्कूल ऑफ बॅडमिंटन सोबत काम करणार
Goa Badminton
Updated on: Oct 08, 2025 | 11:04 PM

गोव्यातील बॅडमिंटन खेळाला आता आणखी चांगले दिवस येणार आहेत. गोवा बॅडमिंटन असोसिएशनने (GBA) राज्यात ग्रासरूट्स ते एलिट बॅडमिंटन इकोसिस्टम तयार करण्यासाठी पदुकोण स्कूल ऑफ बॅडमिंटन (PSB) सोबत सहकार्याची घोषणा केली. यावेळी पदुकोण स्कूल ऑफ बॅडमिंटनचे तांत्रिक संचालक श्री. टी. बालन यांच्यासह माध्यमांचे सदस्य, जीबीए कार्यकारी समितीचे अधिकारी आणि पीएसबीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

गोवा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष मनोज पाटील यांनी, गोव्यात बॅडमिंटनसाठी हा एक निर्णायक क्षण असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले “गेल्या 4 दशकांमध्ये, जीबीएने बॅडमिंटनला राज्यातील एक उत्साही खेळ बनवले आहे. आज आम्ही एक निर्णायक पाऊल पुढे टाकत आहोत. गोवा बॅडमिंटन असोसिएशन आणि पदुकोण स्कूल ऑफ बॅडमिंटन यांच्या युतीमुळे राज्यात दर्जेदार खेळाडू, प्रशिक्षित प्रशिक्षक आणि कार्यक्षम अधिकारी निर्माण होती. तळागाळातील खेळाडू ओळखणे त्यांचा विकास करणे हा या मागील उद्देश आहे. आम्ही एक केंद्र तयार करणार आहोत, जिथे गोव्याचे खेळाडू भारतातील सर्वोत्तम खेळाडूंसोबत प्रशिक्षण घेऊ शकतील. हा उपक्रम गोव्याला एक चांगले क्रीडा केंद्र बनवण्याच्या मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या दृष्टिकोनाशी सुसंगत असेल.

प्रकाश पदुकोण यांनी यावेळी बोलताना म्हटले की, “गोवा बॅडमिंटन असोसिएशनसोबत पार्टनरशीप करणे ही आमच्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. आमची ही पहिलीच पार्टनरशीप आहे. याद्वारे आम्ही शाळा आणि खेड्यांपासून ते जिल्ह्यांपर्यंत आणि राज्यात तळागाळापासून उच्चभ्रू पातळीपर्यंत एक इकोसिस्टम तयार करणार आहोत. आम्ही गोव्यात पीटी शिक्षक आणि प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्यास मदत करू, त्यांना प्रमाणपत्र प्रदान दिले जाईल. प्रत्येक स्तरावर योग्य मूलभूत गोष्टी शिकवल्या जातील याची काळजी घेऊ. आमचा दृष्टिकोन हळूहळू पण सुसंगत असेल, मुलांना लवकर खेळाची ओळख करून दिली जाईल आणि प्रगतीसाठी योग्य मार्गदर्शन दिले जाईल.

प्रकाश पदुकोण यांनी गोव्याच्या पायाभूत सुविधांचे कौतुक केले. ते म्हणाले की, ‘गोव्यात चांगल्या सुविधा आहेत. जीबीए, गोवा क्रीडा प्राधिकरण आणि सरकारच्या पाठिंब्याने, मला विश्वास आहे की या मॉडेलमुळे केवळ चॅम्पियन खेळाडू निर्माण होतील असे नाही तर ते इतर राज्यांसाठी एक ब्लूप्रिंट बनेल. गोव्यातील खेळाडू चांगल्या प्रशिक्षणासाठी राज्य सोडण्याचा विचार करतात, मात्र आता इथ एक अकादमी तयार करण्याचे उद्दिष्ट आहे ज्यामुळे संपूर्ण भारतातील खेळाडू येथे येतील.

आपल्या भाषणात जीबीएचे अध्यक्ष मनोज पाटील यांनी असोसिएशनच्या दीर्घकालीन दृष्टिकोनावर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, ‘ही पार्टनरशीप केवळ खेळाडूंना प्रशिक्षण देण्साठी नसून प्रत्येक गाव आणि शाळेत बॅडमिंटन संस्कृती निर्माण करण्याबाबत आहे. शाळांमध्ये बॅडमिंटनची ओळख करून देण्यासाठी आम्ही ‘शटल टाईम’ उपक्रम सुरू करणार आहोत, ज्यामुळे प्रत्येक मुलाला या खेळाचा अनुभव घेण्याची संधी मिळेल. तिथून आम्ही खेळाडूंची प्रतिभा ओळखू, जिल्हा आणि राज्य स्तरावर त्यांच्यावर काम करु आणि त्यांना पाठिंबा देऊ. आम्हाला विश्वास आहे की हे मॉडेल गोव्याला भारतातील सर्वात गतिमान बॅडमिंटन केंद्रांपैकी एक बनवेल.

जीबीएचे सचिव प्रवीण शेणॉय यांनी पार्टनरशीपच्या रोडमॅपवर भाष्य केले. त्यांनी म्हटले की, ‘या मॉडेलवर देखरेख ठेवण्यासाठी पीएसबीने नियुक्त केलेल्या प्रकल्प व्यवस्थापकासह एक प्रशासकीय रचना स्थापन केली जाईल. पीएसबी सर्व कार्यक्रमांची रचना करेल आणि जीबीए पायाभूत सुविधांचा विकास आणि सीएसआर निधी निर्मितीचे व्यवस्थापन करेल. तळागाळातील कार्यक्रम पुढील 30 ते 45 दिवसांत सुरू होईल.

‘खेळाडू खेळात प्रगती करत असताना आम्ही जिल्हा आणि राज्यस्तरीय कॅम्प आयोजित करू, खेळाडूंसाठी प्रशिक्षण आणि प्रशिक्षक कौशल्य विकास कार्यशाळा भरवू. एआय-आधारित विश्लेषणासह तंत्रज्ञानाचा देखील योग्य वापर करु. शेनॉय यांनी पुढे बोलताना सांगितले की, या पार्टनरशीपचा उद्देश येत्या काही वर्षांत गोव्यात एक पूर्ण विकसित राज्य बॅडमिंटन अकादमी स्थापन करण्याच्या दिशेने काम करणे हा आहे.

या कार्यक्रमाच्या समारोपात दोन्ही संघटनांनी गोव्यातील बॅडमिंटन प्रतिभेचा विकास करणे आणि गोव्याला वेगळी ओळख निर्माण करुन देण्याच्या निर्णयाने झाली. गोवा बॅडमिंटन असोसिएशन आणि पदुकोण स्कूल ऑफ बॅडमिंटनचे संचालक श्री प्रकाश पदुकोण यांनी सामंजस्य करार (एमओयू) वर स्वाक्षरी केली.