दुलीप ट्रॉफी स्पर्धेत गुणांची आकडेवारी कशी ठरते? जाणून घ्या जय पराजयाचं संपूर्ण गणित

देशांतर्गत दुलीप ट्रॉफी स्पर्धेला 5 सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. या स्पर्धेचं स्वरुप बीसीसीआयने बदललं आहे. पारंपारिक विभागीय फॉर्मेटऐवजी इंडिया ए, इंडिया बी, इंडिया सी आणि इंडिया डी असे चार संघ बांधले आहेत. अर्थातच फॉर्मेट बदलल्याने गुणतालिकेतही बदल झालेला आहे. चला सर्वकाही सविस्तर समजून घेऊयात.

दुलीप ट्रॉफी स्पर्धेत गुणांची आकडेवारी कशी ठरते? जाणून घ्या जय पराजयाचं संपूर्ण गणित
| Updated on: Sep 07, 2024 | 6:58 PM

आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय क्रिकेट संघाला चांगली कामगिरी करायची असेल तर त्याची पायाभरणी देशांतर्गत क्रिकेटमध्ये व्हायला हवी. याची जाणीव बीसीसीआयला असल्याने देशांतर्गत क्रिकेटला प्रोत्साहान देण्यासाठी कठोर धोरण अवलंबलं आहे. त्यामुळे दिग्गज खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळाणं भाग पडलं आहे. त्याचे परिणाम यंदाच्या दुलीप ट्रॉफी 2024 स्पर्धेत दिसून आले आहेत. शुबमन गिल, ऋषभ पंत, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर असे दिग्गज खेळाडू या स्पर्धेत उतरले आहेत. त्यामुळे क्रीडारसिकांचा या स्पर्धेकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. इतकंच काय तर बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेटसाठी मानधनही वाढवलं आहे. एकंदरीत या स्पर्धांचा कायापालट झाला असं म्हणायला हरकत नाही. बीसीसीआयने पारंपरिक विभागीय फॉर्मेट काढून टाकले आणि त्याला नवं स्वरूप देत इंडिया ए, इंडिया बी, इंडिया सी आणि इंडिया डी अशी संघांची बांधणी केली आहे. दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील सामने बंगळुरु आणि अनंतपूर येथे सुरु आहेत. स्पर्धेत चार संघ असून प्रत्येक संघ तीन सामने खेळणार आहे. या स्पर्धेत इंडिया ए संघाची धुरा शुबमन गिलकडे, इंडिया बी संघाची धुरा अभिमन्यू ईश्वरनकडे, इंडिया सी संघाची...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा