Suresh Raina : सुरेश रैनाचा देशांतर्गत क्रिकेटला अलविदा, आयपीएलमध्येही दिसणार नाही

2020 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तेव्हापासून आयपीएल खेळताना दिसत होता. त्याने आयपीएल आत्तापर्यंत चांगली कामगिरी सुध्दा केली आहे

Suresh Raina : सुरेश रैनाचा देशांतर्गत क्रिकेटला अलविदा, आयपीएलमध्येही दिसणार नाही
सुरेश रैना
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Sep 06, 2022 | 1:05 PM

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) आपलं अधिराज्य गाजवताना सुरेश रैना (Suresh Raina) आता दिसणार नाही. त्याने संपुर्ण क्रिकेटला पूर्णपणे अलविदा केला आहे. रैनाने देशांतर्गत क्रिकेटमधूनही पुर्णपणे निवृत्ती घेतली असून, यापुढे तो आयपीएलमध्ये खेळताना सुध्दा अजिबात दिसणार नाही. आता तो भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी (BCCI) संलग्न असलेल्या कोणत्याही स्पर्धेचा भाग असणार नाही असं त्याने ट्विट केलं आहे.

It has been an absolute honour to represent my country & state UP. I would like to announce my retirement from all formats of Cricket. I would like to thank @BCCI, @UPCACricket, @ChennaiIPL, @ShuklaRajiv sir & all my fans for their support and unwavering faith in my abilities ??

— Suresh Raina?? (@ImRaina) September 6, 2022


दोघांची एकाच दिवशी आंतराराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

2020 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तेव्हापासून आयपीएल खेळताना दिसत होता. त्याने आयपीएल आत्तापर्यंत चांगली कामगिरी सुध्दा केली आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीने ज्यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्याचवेळी सुरेश रैनाने सुध्दा निवृत्ती जाहीर केली होती.

सुरेश रैनाचं आत्तापर्यंतच करिअर

  1. सुरेश रैनाने आत्तापर्यंत 226 एकदिवसीय सामने खेळले आहेत.
  2. 194 डावांमध्ये त्याने 35.31 च्या सरासरीने 5615 धावा काढल्या आहेत.
  3. विशेष म्हणजे 5 शतके आणि 36 अर्धशतके केली आहेत
  4. सर्वोत्तम धावसंख्या 116 धावा
  5. आंतरराष्ट्रीय T20 मध्ये त्याने 78 सामन्यांच्या 66 डावांमध्ये 29.16 च्या सरासरीने 1604 धावा केल्या.
  6. सुरेश रैनाचा आंतरराष्ट्रीय T20 चा स्ट्राइक रेट 134.79 होता.
  7. रैनाने भारतासाठी T20 मध्ये 1 शतक आणि 5 अर्धशतके झळकावली आहेत.
  8. रैनाची सर्वोत्तम धावसंख्या 101 धावा आहे.