ICC Champions Trophy सुरू होण्यापूर्वीच ‘तिरंग्या’वरून वाद; ही टोलवाटोलवी कोण सहन करणार, PCB ला शिव्यांची लाखोली

ICC Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी सुरू होण्यापूर्वीच नवीन वाद उफळला आहे. भारतीय चाहते त्यामुळे प्रचंड नाराज झाले आहेत. त्यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला शिव्यांची लाखोली वाहिली आहे. काय आहे हा वाद?

ICC Champions Trophy सुरू होण्यापूर्वीच तिरंग्यावरून वाद; ही टोलवाटोलवी कोण सहन करणार, PCB ला शिव्यांची लाखोली
तिरंगा नाही
| Updated on: Feb 18, 2025 | 11:09 AM

आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीचा (ICC Champions Trophy 2025) पहिला सामना सुरू होण्यासाठी अवघा काही कालावधी उरला आहे. कराची येथील नॅशनल स्टेडियमवर भारतीय तिरंगा ध्वज नसल्याने वाद उफाळला आहे. भारतीय चाहते त्यामुळे प्रचंड नाराज झाले आहेत. त्यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला शिव्यांची लाखोली वाहिली आहे. सोशल मीडियावर PCB ट्रोल झाले, त्यावर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने स्पष्टीकरण दिले आहे.

वादाचं कारण काय?

चॅम्पियस ट्रॉफी सुरू होण्याच्या काही तासांअगोदर कराची येथील नॅशनल स्टेडियममध्ये सर्व देशांचे ध्वज असताना त्यात भारतीय ध्वज तिरंगा नसल्याचे समोर आले होते. सोशल मीडियावर या मुद्दावरून एकच काहूर माजले. याविषयीचा व्हिडिओ पण समाज माध्यमावर व्हायरल झाला. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर टीकेची झोड उठली. त्यानंतर बोर्डाने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. पण तो दावा काही टिकाव धरू शकला नाही.

या बहाण्याने उडाला भडका

या मुद्दावर स्पष्टीकरण देताना PCB ने ढोंगीपणा दाखवल्याचे सोशल मीडियावर सांगण्यात येत आहे. केवळ त्याच देशाचे झेंडे कराची मैदानावर लावण्यात आले आहे, जे पाकिस्तानमध्ये चॅम्पियन ट्रॉफी खेळत आहेत, असा दावा पीसीबीने केल्याचा दावा करण्यात येत आहे. भारत या टुर्नामेंटमध्ये सर्व सामने हे दुबईत खेळत आहे. त्यामुळे तिरंगा कराची स्टेडियमवर लावण्यात आला नसल्याचे पीसीबीने स्पष्ट केले. तर बांग्लादेश सुद्धा त्यांचे सामने दुबईत खेळत असल्याने त्यांचाही ध्वज लावण्यात आला नसल्याचे स्पष्टीकरण पीसीबीने दिले. 19 फेब्रुवारीपासून क्रिकेटचा महाकुंभाला सुरुवात होत आहे. पण मुद्दामहून पाकिस्तानने भारतीय ध्वज कराची मैदानात लावला नसल्याचा आरोप भारतीय चाहत्यांकडून करण्यात येत आहे. त्यावरून या स्पर्धेपूर्वीच सामना रंगला आहे.

हे वृत्त खोटं – पीसीबी

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावरील या वादावर स्पष्टीकरण दिले आहे. काही लोक मुद्दामहून अफवा पसरवत असल्याचा दावा बोर्डाने केला. चॅम्पियन ट्रॉफी ही आठ वर्षांनी येते. संपूर्ण पाकिस्तानच्या मुख्य महामार्ग आणि दर्शनी ठिकाणी चॅम्पियन ट्रॉफीत सहभागी देशांचे राष्ट्रध्वज पोस्टर लावल्याचा दावा पीसीबीने केला.