
ICC Champions Trophy 2025 मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला. कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडियाने कांगारूवर ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने आता अंतिम सामन्यात धडक दिली आहे. विराट कोहलीने हा सामना पलटवला. भारतीय संघाने दुबईत सलग चौथा विजय नोंदवला. तर त्याचवेळी भारत हारण्याची भविष्यवाणी करणाऱ्या आयआयटी बाबाला पण टीम इंडियाने चांगलेच लोळवले. यापूर्वी पाकिस्तान संघ आणि आता ऑस्ट्रेलिया जिंकण्याचे भाकीत बाबाने केले होते. अभयसिंह यावेळी चांगलाच तोंडघशी आपटला आहे.
4 गड्यांनी मिळवला विजय
कांगारूंनी भारतीय संघासमोर 265 धावांचं आव्हान उभं केलं होतं. हा मोठा पल्ला नव्हता. यावेळी ऑस्ट्रेलिया समोर असल्याने चाहत्यांची सुद्धा धाकधूक वाढली होती. यापूर्वी अनेकदा ऑस्ट्रेलियासमोर टीम इंडियाचे प्रदर्शन चांगले नव्हते. त्याच आधारे आयआयटी बाबा अभय सिंह भारत हारण्याचे भाकीत करत होता. पण टीम इंडियाने 48 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर विजयश्री खेचून आणला. 4 गड्यांनी टीम इंडिया जिंकली.
आयआयटी बाबा यांनी यापूर्वी भारत -पाकिस्तानच्या सामन्यावेळी देवाच्या मनातच भारताला हरवण्याचे आहे. पाकिस्तान सामना जिंकणार आहे. टीम इंडियाने कितीही प्रयत्न केला तरी फायदा नाही असे भाकीत केले होते. त्या सामन्यात भारताने पाकिस्तानला लोळवले.
शाब्दिक धुलाई केली. बाबांना मेंटल म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली. तर काही टीम इंडिया फॅन्सनी बाबाला मेंटल हॉस्पिटलचा रस्ता दाखवण्याचा सल्ला दिला.