T20 विश्वचषक : भारतीय महिला संघाची झोकात सुरुवात, बलाढ्य ऑस्ट्रेलियावर मात

| Updated on: Feb 21, 2020 | 5:24 PM

महिला टी 20 विश्वचषकात हरमनप्रीत कौरच्या टीम इंडियाने झोकात सुरुवात केली. भारताने ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाचा 17 धावांनी पराभव करुन विजयी सलामी दिली.

T20 विश्वचषक : भारतीय महिला संघाची झोकात सुरुवात, बलाढ्य ऑस्ट्रेलियावर मात
Follow us on

ICC Women’s T20 World Cup 2020, Live Score: महिला टी 20 विश्वचषकात हरमनप्रीत कौरच्या टीम इंडियाने झोकात सुरुवात केली. भारताने ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाचा 17 धावांनी पराभव करुन विजयी सलामी दिली (India beat Australia). पूनम यादवच्या धारदार गोलंदाजीने टीम इंडियाचा विजय सोपा झाला. पूनमने 4 षटकात 19 धावा देत 4 विकेट्स घेतल्या.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून भारताला प्रथम फलंदाजीचं निमंत्रण दिलं होतं. दिप्ती शर्माच्या 49 धावांच्या जोरावर भारताने निर्धारित 20 षटकात 4 बाद 132 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला भारताने 19.5 षटकात 115 धावात गुंडाळलं. त्यामुळे पहिल्या सामन्यात भारताने 17 धावांनी विजयाची नोंद केली.

टीम इंडियाच्या सलामीवीर स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा यांनी 41 धावांची सलामी दिली. स्मृतीने 11 चेंडूत 10 तर शेफाली वर्माने 15 चेंडूत 29 धावा ठोकल्या. जेमीया रॉड्रीग्ज 26, कर्णधार हरमनप्रीत कौरने 2 धावा केल्या (India beat Australia).

भारताने वेगवान सुरुवात करत 4 षटकात 40 धावा केल्या. मात्र नंतर झटपट तीन विकेट गेल्याने भारतीय संघ अडचणीत सापडला होता. मात्र भारताला 20 षटकात 4 बाद 132 अशी समाधानकारक मजल मारता आली.