Shubman Gill : शुबमन गिल टीमचा कॅप्टन, तो फिट झाला तरी त्याला गुवाहाटी टेस्टमध्ये खेळवणार नाही, त्यामागे एक मोठं कारण

Shubman Gill Injury : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या सीरीजमध्ये टीम इंडिया अडचणीत आहे. भारताने पहिला कसोटी सामना गमावलाय. 1-0 ने टीम पिछाडीवर आहे. अशा स्थितीत दुसरी कसोटी जिंकण खूप महत्वाच आहे. टीमचा कॅप्टन शुबमन गिल फिट झाला, तरी त्याला दुसऱ्या कसोटीत खेळवणार नाही.

Shubman Gill : शुबमन गिल टीमचा कॅप्टन, तो फिट झाला तरी त्याला गुवाहाटी टेस्टमध्ये खेळवणार नाही, त्यामागे एक मोठं कारण
shubman gill
Image Credit source: PTI
Updated on: Nov 20, 2025 | 3:38 PM

India vs South Africa 2nd Test : भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये दुसरा कसोटी सामना गुवहाटी येथे होणार आहे. या टेस्टमध्ये शुबमन गिलला संधी मिळणं अशक्य आहे. भारताचे बॅटिंग कोच सितांशु कोटक यांनी कर्णधार शुबमन गिलबद्दल एक स्टेटमेंट दिलं आहे. त्यावरुन एक गोष्ट स्पष्ट आहे की, गिल फिट जरी झाला, तरी त्याला गुवहाटी टेस्टमध्ये संधी मिळणार नाही. शुबमन गिल रिकव्हर होतोय. पण फिट झाला, तरी त्याला संधी मिळणं कठीण आहे. कारण शुबमनला मॅच दरम्यान पुन्हा स्पेजॅमचा त्रास होऊ नये, अशी टीम मॅनेजमेंटची भूमिका आहे. सितांशु कोटक यांनी गिलच्या फिटनेसवर स्टेटमेंट दिलं. “तो वेगाने रिकव्हर होतोय. पण त्याच्याबद्दल 21 नोव्हेंबरच्या संध्याकाळी निर्णय घेतला जाईल. तो पूर्णपणे फिट झाला, तरी त्याला पुन्हा काही होऊ नये हीच डॉक्टर आणि फिजियोची चिंता आहे. पुन्हा मानेचा त्रास होणार नसेल, तर त्याने खेळावं. अन्यथा तो आराम करेल” असं सितांशु कोटक म्हणाले.

शुबमन गिलच्या अनुपस्थितीत विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत टीम इंडियाचा कॅप्टन असेल. रिपोर्ट्सनुसार गिलला वनडे सीरीजमधूनही वगळलं जाऊ शकतं. पंतच त्याच्याजागी कॅप्टनशिप संभाळेल. अशा स्थितीत गिलच गुवहाटी टेस्टच्यावेळी टीम बाहेर बसणं पक्क मानलं जात आहे. गिलच्या अनुपस्थितीत कोणाला संधी मिळणार? हा प्रश्न आहे. साई सुदर्शनला संधी मिळू शकते. पण अशावेळी टीममध्ये सात लेफ्टी बॅट्समन होतील. दक्षिण आफ्रिकेच्या सायमन हार्मरसाठी ही चांगली बातमी ठरेल. हार्मरने मागच्या पहिल्या टेस्टमध्ये आठ विकेट काढले. टीम इंडियाच्या पराभवाला तो कारण ठरला होता.

दुखापत कशी झाली?

पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताची फलंदाजी होती. शुबमनने स्वीप शॉट मारला. पण त्याला मानेला झटका लागल्यासारखं जाणवलं. शुबमनला तीव्र वेदना जाणवल्या. त्यावेळी शुबमन 4 धावांवर खेळत होता. त्याला मैदान सोडावं लागलं. शुबमनला रुग्णालयात नेलं. शुबमनची दुखापत गंभीर असल्याच लक्षात आलं. त्यामुळे तो दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटिंगसाठी येऊ शकला नाही.