IRE vs IND : जिंकायचय तर वैभव सूर्यवंशीला खेळवा, नॉकआऊट मॅचमध्ये तो किती डेंजर त्यासाठी ही 5 उदाहरणं पुरेशी

IRE vs IND : आयर्लंडकडून पराभव टाळून सीरीज बरोबरीत सोडवायची असेल तर वैभव सूर्यवंशीला खेळवा. त्यात फायदा आहे. नॉकआऊट मॅचमध्ये वैभव सूर्यवंशी खूप डेंजर आहे. या पाच उदहारणांमधून ते लक्षात येईल.

IRE vs IND :  जिंकायचय तर वैभव सूर्यवंशीला खेळवा, नॉकआऊट मॅचमध्ये तो किती डेंजर त्यासाठी ही 5 उदाहरणं पुरेशी
vaibhav sooryavanshi
Image Credit source: PTI
| Updated on: Jun 27, 2026 | 2:04 PM

Vaibhav Sooryavanshi IND vs IRE 2nd T20I : भारत आणि आयर्लंडमध्ये सुरु असलेली टी20 सीरीज रोमांचक वळणावर आली आहे. सीरीजच्या पहिल्या सामन्यात यजमान आयर्लंडने मोठा उलटफेर घडवत भारताला धक्का दिला. आयर्लंडने टीम इंडियाचा 34 धावंनी पराभव केला. या विजयामुळे टीम इंडियाला ही टी20 सीरीज तर जिंकता येणार नाही, पण बरोबरीत मात्र नक्की सोडवता येईल. टीम इंडियाकडे आता पुढच्या सामन्यात विजय मिळवून मालिका 1-1 बरोबरीत सोडवण्याची संधी आहे. या करो या मरो सामन्यात भारताचा 15 वर्षांचा फलंदाज वैभव सूर्यवंशीला डेब्यूची संधी मिळाल्यास तो भारताला विजय मिळवून देऊ शकतो.

टीम इंडिया ही सीरीज गमावू शकते अशी स्थिती आहे. अशावेळी सर्वांच्या नजरा वैभव सूर्यवंशीकडे लागल्या आहेत. वैभव सूर्यवंशीला दबावात आणि नॉकआऊट मॅचमध्ये परफॉर्म करायला खूप आवडतं. टीम समोर विजयाशिवाय काही पर्याय नसतो, तेव्हा वैभव सूर्यवंशी धावांचा पाऊस पडतो. यावर्षी वेगवेगळ्या प्रसंगात 5 नॉकआऊट सामने खेळले आहेत. प्रत्येकवेळी त्याने प्रतिस्पर्धी संघाची गोलंदाजी फोडून काढली आहे.

ही पाच उदहारणं

अंडर 19 वर्ल्ड कप 2026 ची सेमीफायनल : वैभव सूर्यवंशीने अफगानिस्तान विरुद्ध सामन्यात फक्त 33 चेंडूत 9 चौकार 4 षटकारांच्या मदतीने 68 धावा केल्या. भारताच्या U19 टीमने हा सामना 7 विकेट्सने जिंकला.

अंडर 19 वर्ल्ड कप 2026 फायनल : सर्वात मोठ्या मंचावर फायनलमध्ये इंग्लंडच्या गोलंदाजांनी पिसं काढाली. फक्त 80 चेंडूत 15 चौकार आणि 15 षटकारांच्या मदतीने 175 धावांची इनिंग खेळला. त्यामुळे भारताने अंडर 19 वर्ल्ड कप फायनल 100 धावांनी जिंकली.

IPL 2026 एलिमिनेटर मॅच :  सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध करो या मरो मॅचमध्ये फक्त 29 चेंडूत 5 चौकार आणि 12 षटकारांच्या मदतीने 97 धावा ठोकल्या. राजस्थानने 47 धावांनी मॅच जिंकली.

IPL 2026 का क्वालिफायर 2 : गुजरात टायटन्स विरुद्ध आणखी एका नॉकआऊट सामन्यात 47 चेंडूत 8 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 96 धावांची शानदार इनिंग खेळला. गुजरातने हा सामना 7 विकेट्सने जिंकला.

नुकतीच तिरंगी मालिकेत श्रीलंका अ विरुद्ध फायनल झाली. या मॅचमध्ये वैभवने 29 चेंडूत 10 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 94 धावा ठोकल्या. इंडिया ए ने हा सामना 66 धावांनी जिंकला.

Follow Us