AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ramayana: धक्कादायक! आदिनाथ कोठारेच्या ‘रामायण’ची काळी बाजू समोर, थेट क्रूच्या… संतापजनक सत्य समोर

Ramayana: दिग्दर्शक नमित मल्होत्रा दिग्दर्शित 'रामायण' सिनेमा बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करताना दिसत आहे. पण पडद्या मागच्या कर्मचाऱ्यांना कशी वागणूक देण्यात आली, ती काळी बाजू आता समोर आली आहे... एका सोशल मीडिया पोस्टमुळे संतापजनक सत्य समोर समोर आलं आहे.

Ramayana: धक्कादायक! आदिनाथ कोठारेच्या 'रामायण'ची काळी बाजू समोर, थेट क्रूच्या... संतापजनक सत्य समोर
Ramayana
| Updated on: Nov 25, 2026 | 11:45 AM
Share

Ramayana: एकीकडे दिग्दर्शक नमित मल्होत्रा दिग्दर्शित ‘रामायण’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करताना दिसत आहे. सिनेमाची कमाईने तर 1700 कोटी रुपयांचा आकडा ओलांडला आहे. तर दुसरीकडे, अभिनेता आदिनाथ कोठारे स्टारर ‘रामायण’ सिनेमाची काळी बाजू समोर येत आहे. ‘रामायण’ प्रोजेक्टवर काम करणारे VFX आर्टिस्ट राहुल धनवे (Rahul Dhanwe) यांनी निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत. राहुल यांचे आरोप आहेत की, नमित यांची VFX कंपनी DNEG ला तब्बल साडेचार वर्ष दिली. पण या चार वर्षात कोणतीच पगारवाढ दिली नाही. उलट त्यांनी ग्रॅच्युटी जवळ आल्यानंतर राहुल यांनी कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

राहुल धनवे (Rahul Dhanwe) यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, ते एक Environmental Modeling Artist आहेत. हा एक प्रकारचा 3D आर्टीस्ट असतो. जो सिनेमात आणि व्हिडीओ गम्समध्ये डोंगर, नदी आणि जंगलचं व्हिज्यूअल्स तयार करतात. राहुल यांनी सांगितल्यानुसार, गेल्या साडे चार वर्षांपासून DNEG सोबत काम करता आहे. यादरम्यान राहुल यांनी ‘रामायण’ सोबतच ‘टॉक्सिक’, ‘फाइटर’ आणिा ‘ब्रह्मास्त्र’ सारख्या सिनेमांसाठी काम केलं. पण त्यांचे आरोप आहेत की, त्यांना एक रुपयाची देखील पगार वाढ मिळालेली नाही.

एक्सवर ट्विट करत राहुल यांनी संताप व्यक्त केला आहे. ‘शाहश नमित मल्होत्रा आणि द रामायण वर्ल्ड.. रियली वेल प्लॅन्ड! मी DNEG साठी साडेचार वर्ष काम केल, ज्यामधील दोन वर्ष मी ‘रामायण’ प्रोजेक्टवर काम केलं. मला अपेक्षा होती की पुढे जाऊन परिस्थिती सुधारेल. पण त्याऐवजी आम्हाला काय मिळालं? एक लेऑफ? कंपनीला साथ दिल्याबद्दल मी कोणत्याही गोष्टी अपेक्षा केली नव्हती. पण माझ्या करिअरची साडेचार वर्षे दिल्यानंतर मला किमान अशा वागणुकीची तर अजिबात अपेक्षा नव्हती.”

राहुल यांचं म्हणणं आहे की, त्याने ‘रामायण’साठी दोन वर्षे पूर्ण मेहनत, कौशल्य आणि निष्ठेनं काम केलं. या काळात खासगी आयुष्यात अनेक गोष्टींचा त्याग केला. सिनेमा यशस्वी झाला किंवा बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली, तरी त्यातून मला कोणताही हिस्सा मिळणार नाही याची मला कल्पना आहे. त्यामुळे अनेक वेळा वाटतं की आपण जणू काही चॅरिटीच केली आहे.

राहुलच्या मते, कंपन्यांचा मुख्य उद्देश व्यवसाय करणं हा असतो, हे मला कळतं. पण त्याबदल्यात कलाकारांना वापरून फेकून देण्यासारखी वस्तू समजलं जावं का? राहुल सांगतो की, त्याला DNEG मध्ये आपली साडेचार वर्षे वाया गेल्याचा पश्चात्ताप होतो. जर त्याने ही वर्षे दुसऱ्या कोणत्या कंपनीत घालवली असती, तर तो व्यावसायिक आणि आर्थिकदृष्ट्या खूप पुढे गेला असता, असं त्याचं मत आहे.

आपल्या पोस्टमध्ये राहुलने ‘रामायण’ पार्ट 2 वर काम करणाऱ्या व्हिज्युअल आर्टिस्ट्सबद्दल चिंता व्यक्त केली आहे. इतर लोकांना अशा परिस्थितीला सामोरं जावं लागू नये, अशी त्याला आशा आहे. राहुलच्या मते, DNEG हा त्याच्या करिअरमधील सर्वात वाईट स्टुडिओ अनुभव राहिला आहे. कंपनीचं नाव खूप मोठं आहे. पण आपल्या कर्मचाऱ्यांशी योग्य वागणूक कशी द्यायची, हे तिला कळत नाही.

कंपनीचा निरोप घेताना राहुलने इतर कलाकारांना सल्ला दिला आहे की, DNEG मध्ये नोकरी करण्यापूर्वी त्यांनी नीट विचार करावा. जर त्यांच्याकडे दुसऱ्या कोणत्या कंपनीचा चांगली ऑफर असेल, तर त्याला प्राधान्य द्यावं. लोकांनी DNEG ला शेवटचा पर्याय म्हणूनच पहावं. राहुल यांच्या मते, त्यांनी आपल्या करिअरची साडेचार वर्षे गमावली. पण इतर कलाकारांनी अशी चूक करू नये. मात्र, राहुलने आपल्या पोस्टच्या कमेंटमध्ये सांगितलं की, त्याला आता त्याची ग्रॅच्युटी मिळाली आहे.

Follow Us
लाचखोरीच्या आरोपांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; राऊतांचा शिंदे...
Sanjay Raut : लाचखोरीच्या आरोपांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; संजय राऊतांचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल
सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलवली
Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलवली, चर्चांना उधाण
रोहित पवारांच्या गुप्त बैठकीची चर्चा, सुप्रिया सुळे म्हणाल्या; मी....
Supriya Sule : रोहित पवारांच्या गुप्त बैठकीची चर्चा, सुप्रिया सुळे म्हणाल्या; मी पहिल्यांदाच....
खासदार संजय राऊत यांच्याकडून राज्य सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप...
Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांच्याकडून राज्य सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; नेमकं काय म्हणाले?
रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चावरून सुप्रिया सुळे नाराज? विश्वासात...
Rohit Pawar : रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चावरून सुप्रिया सुळे नाराज? विश्वासात घेतले नाही, पत्रकार परिषदेत फोटोही नव्हता- सूत्र
नागपुरात मोर्चाची तयारी, इकडे सरकारकडून बैठकीचं आमंत्रण; रोहित पवार...
Chandrashekhar Bawankule : नागपुरात मोर्चाची तयारी, इकडे सरकारकडून बैठकीचं आमंत्रण; रोहित पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
रोहित पवारांची नागपुरात दोन तास गुप्त बैठक; ट्रॅक्टर मोर्चाआधी नेमकी
Rohit Pawar : रोहित पवारांची नागपुरात दोन तास गुप्त बैठक; ट्रॅक्टर मोर्चाआधी नेमकी काय रणनीती ठरली?
रात्रीचा अंधार, खोल दरी अन् सात तासांचं रेस्क्यू ऑपरेशन; तोरणा किल्ल्य
Pune : रात्रीचा अंधार, खोल दरी अन् सात तासांचं रेस्क्यू ऑपरेशन; तोरणा किल्ल्यावर 20 वर्षीय तरुणाला जीवदान
आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं पात्र लिहिलं
Aditya Thackearay : आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं पात्र लिहिलं; नेमकं कारण काय?
शिवसेना कोणाची? पक्षचिन्हाच्या लढाईत आज काय घडणार? शिवसेना पक्षचिन्ह..
Shivsena : शिवसेना कोणाची? पक्षचिन्हाच्या लढाईत आज काय घडणार? शिवसेना पक्षचिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज युक्तिवाद