एक बोट फ्रॅक्चर, पुन्हा चेंडू आदळला, चार बोटांनी बॅट पकडून भिडला, चेतेश्वर पुजाराची संघर्षकथा

| Updated on: Jan 28, 2021 | 6:44 PM

टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौरा संपवून परत आली आहे. संघातील खेळाडू आता पुढील मालिकांसाठी तयारी करत आहेत. परंतु ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील अनेक घडामोडींवर अजूनही चर्चा सुरु आहेत.

एक बोट फ्रॅक्चर, पुन्हा चेंडू आदळला, चार बोटांनी बॅट पकडून भिडला, चेतेश्वर पुजाराची संघर्षकथा
Follow us on

मुंबई : टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौरा संपवून परत आली आहे. संघातील खेळाडू आता पुढील मालिकांसाठी तयारी करत आहेत. परंतु ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील अनेक घडामोडींवर अजूनही चर्चा सुरु आहेत. त्यातही प्रामुख्याने ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकून भारतीय संघाने मोठा पराक्रम गाजवला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात 3 विकेट्सने शानदार विजय मिळवून भारताने बॉर्डर-गावसकर मालिका 2-1 ने नावावर केली. ही मालिका जिंकण्यात भारताची अभेद्य भिंत चेतेश्वर पुजाराचा (Cheteshwar Pujara) मोलाचा वाटा राहिलेला आहे. (Ind Vs Aus : Cheteshwar Pujara discribe how he was able to hold bat only with four fingers)

ब्रिस्बेन कसोटीच्या चौथ्या डावात भारतीय संघ सुरुवातीला बॅकफुटवर होता. त्यातच बॅटिंग करताना चेतेश्वर पुजाराच्या अंगठ्याला दुखापत झाली तसंच अनेक वेळा त्याच्या हेल्मेटला चेंडू लागले. ऑस्ट्रेलियन जलदगती गोलंदाजांनी फेकलेले वेगवान बाऊन्सर्स पुजाराने अंगावर झेलले. अनेकांना त्यावेळी पुजाराबाबत चिंता वाटत होती. परंतु बॅटिंग न थांबवता तसंच जिद्द न सोडता भारताच्या विजयासाठी तो खेळपट्टीवर तळ ठोकून राहिला. चेतेश्वर पुजारा म्हणजे भारतीय कसोटी संघाच्या पाठीचा कणा झाला आहे. या डावात केलेल्या फलंदाजी करणं सोपं नव्हतं, असं पुजारा म्हणतो.

पुजाराने सांगितलं की, जखमी बोटासह या सामन्यात फलंदाजी करणं सोपं नव्हतं. सिडनी आणि ब्रिस्बेन कसोटी सामन्यात तो जखमी बोटासह फलंदाजी करत होता. त्यातच गाबा कसोटीत (ब्रिस्बेन) एक उसळता चेंडू जखमी बोटावर येऊन आदळला, त्यानंतर फलंदाजी करणं शक्यच नव्हतं. दुखणं वाढलं होतं, परिस्थिती इतकी बिकट होती की त्याला बॅट नीट पकडताच येत नव्हती. तरीदेखील त्याने चार बोटांनी बॅट पकडली आणि फलंदाजी केली. या डावात पुजाराने तब्बल 211 चेंडू खेळून काढत 56 धावा फटकावल्या. या खेळीत त्याने चार चौकारही लगावले. पुजाराच्या याच खेळीमुळे ऑस्ट्रेलियन संघाचं मनोधैर्य तुटलं. पुढे रिषभ पंतने तर कांगारुंचे मनसुबे उधळून भारताच्या विजयाचा गुलाल उधळला.

हेझलवुडच्या बाउन्सरवर पुजाराचं हेल्मेट फुटलं

हाताला बसलेल्या फटक्यानंतर पुजाराने जोमाने खेळायला सुरुवात केली. मात्र पुन्हा डावाच्या 51 व्या ओव्हरमध्ये आणखी एक प्रकार घडला. यावेळेसही हेझलवूड गोलंदाजी करत होता. हेझलवूडने शॉर्ट पिच बॉल टाकला. हा बॉल पुजाराच्या हेल्मेटवर येऊन आदळला. हा शॉर्ट पीच चेंडू इतक्या वेगाने आला की पुजाराचं हेल्मेट फुटलं. त्याचे दोन तुकडे झाले.

व्हिडीओ पाहा

गिलने पाया रचला, तर पुजाराने संयमी खेळ करत भारताचं आव्हान जिवंत ठेवलं

चौथ्या कसोटीत भारतीय संघाच्या विजयामध्ये शुभमन गिल आणि रिषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा यांनी केलेली कामगिरी महत्वाची ठरली. भारताच्या विजयाचा पाया शुभमन गिलनं रचला. सकाळी सलामीवीर रोहित शर्मा बाद झाल्यानंतर गिलने चेतेश्वर पुजाराच्या साथीने डाव सावरला. शुभमन गिलंने सामन्याच्या पहिल्या डावात 50 धावा केल्या होत्या. तर, दुसऱ्या डावात त्याने 91 धावा चोपल्या. चेतेश्वर पुजारा यानं ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्याचा सामना करत 56 धावा केल्या. चेतश्वर पुजारानं 211 चेंडूंचा सामना करत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना यश मिळू दिलं नाही.

संबंधित बातम्या

फंलदाजी करताना हातावर चेंडूचा जोरदार फटका, पुजारा मैदानात कोसळला

पुजारा, माझं ऐकलंस तर अर्धी मिशी उडवून मैदानात उतरेन, अश्विनचं खुलेआम चॅलेंज

(Ind Vs Aus : Cheteshwar Pujara discribe how he was able to hold bat only with four fingers)