पुजारा, माझं ऐकलंस तर अर्धी मिशी उडवून मैदानात उतरेन, अश्विनचं खुलेआम चॅलेंज

'इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत मोईन अली किंवा कुठल्याही स्पिनरला पुजाराने पुढे येऊन शॉट खेळला, तर मी अर्ध्या मिशा उडवून मैदानात उतरेन, हे एक खुलं आव्हान आहे' असं अश्विन म्हणाला. (R Ashwin challenges Cheteshwar Pujara)

पुजारा, माझं ऐकलंस तर अर्धी मिशी उडवून मैदानात उतरेन, अश्विनचं खुलेआम चॅलेंज
Follow us
| Updated on: Jan 26, 2021 | 11:53 AM

मुंबई : भारतीय ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याने इंग्लंड (India vs England) विरुद्ध कसोटी मालिका सुरु होण्यापूर्वी टीम इंडियाचा फलंदाज चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) याच्यासमोर अनोखं चॅलेंज ठेवलं आहे. पुजाराने इंग्लंडच्या कुठल्याही स्पिनरच्या गोलंदाजीवर ओव्हर द टॉप (डोक्यावरुन) शॉट मारला, तर मी अर्धी मिशी उडवेन, असं अश्विन म्हणाला. (R Ashwin challenges Cheteshwar Pujara for over the top shot in Eng VS Ind Test Series)

इंग्लंड संघात खतरनाक स्पिनर्स

पाच फेब्रुवारीपासून इंग्लंडचा भारत दौरा सुरु होणार आहे. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील सुरुवातीच्या दोन मॅचेस चेन्नईत खेळवल्या जाणार आहेत. पाहुण्या संघात मोईन अली, डॉम बेस आणि जॅक लीच यासारखे तीन स्पिनर्स आहेत.

रविचंद्रन अश्विनने टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड (Vikram Rathour) यांच्याशी बातचित करतानाचा व्हिडीओ आपल्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट केला आहे. स्पिनर्सच्या गोलंदाजीवर पुढे येऊन शॉट खेळता न येण्याचं ठोस कारण पुजाराने सांगितल्याचं विक्रम राठोड अश्विनला म्हणाले. त्यानंतर अश्विनने या गमतीला चॅलेंजमध्ये रुपांतरित केलं.

विक्रम राठोडांनी सांगितली कारणं

‘आम्ही कधी पुजाराला ऑफ-स्पिनरच्या गोलंदाजीवर ओव्हर द टॉप मारताना पाहणार आहोत का?’ असा प्रश्न अश्विनने राठोड यांवा विचारला. त्यावर ‘काम सुरु आहे’ असं उत्तर राठोड यांनी दिलं. ‘मी त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहे, की त्याने किमान एकदा तरी प्रयत्न करावा, पण तो ऐकत नाही. तो असं न करण्याची अनेक प्रबळ कारणं मला देतो’ असंही राठोड यांनी सांगितलं.

“तर मी अर्ध्या मिशा उडवेन…”

‘इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत मोईन अली किंवा कुठल्याही स्पिनरला पुजाराने पुढे येऊन शॉट खेळला, तर मी अर्ध्या मिशा उडवून मैदानात उतरेन, हे एक खुलं आव्हान आहे’ असं अश्विन म्हणाला. (R Ashwin challenges Cheteshwar Pujara for over the top shot in Eng VS Ind Test Series)

चेतेश्वर पुजाराने टीम इंडियात फलंदाजीची ‘मजबूत भिंत’ म्हणून राहुल द्रविडप्रमाणे आपली ओळख बनवली आहे. त्याची खेळाची स्वतःची शैली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी आणि ब्रिस्बेन कसोटीत त्याने चुणूक दाखवली. पुजारा भक्कमपणे एक बाजू सांभाळून धरतो, त्यामुळे समोरच्या फलंदाजाला मोकळेपणाने स्ट्रोक मारता येतात.

“पुजाराला का चिडवतोस?”

विक्रम राठोड यांनी पुजाराच्या फलंदाजीच्या पद्धतीचं कौतुक करत अश्विनला प्रश्न विचारला. डिफेन्सिव फलंदाजी करण्यासाठी पुजाराला का चिडवतोस? असं विचारल्यावर ‘नाथन लायनसारखं कोणी गोलंदाजी करताना पुजारा जसा खेळतो, ते पाहून माझ्या हृदयाची धडधड वाढते’ असं तितकंच मजेशीर उत्तर अश्विननेही दिलं.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा पुजारा हा दुसरा फलंदाज ठरला आहे. त्याने आठ डावात 33.88 च्या सरासरीने 271 धावा ठोकल्या आहेत.

संबंधित बातम्या :

इंग्लंडच्या टीमने रचला इतिहास, टेस्ट क्रिकेटच्या 144 वर्षांच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं….!

इंग्लंडच्या या खेळाडूचा भारताला धोका, चष्मा घालून दांडी गुल करण्यात माहिर!

(R Ashwin challenges Cheteshwar Pujara for over the top shot in Eng VS Ind Test Series)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.