England Tour India 2021 | इंग्लंडच्या या खेळाडूचा भारताला धोका, चष्मा घालून दांडी गुल करण्यात माहिर!

भारताकडे अश्विनसारखा स्टार फिरकी गोलंदाज आहे तर इंग्लंडचा संघ जॅक लीच आणि डोम बेसच्या फिरकी जोडीसह कसोटी क्रिकेटमध्ये मैदानात उतरेल. | Ind Vs Eng

England Tour India 2021 | इंग्लंडच्या या खेळाडूचा भारताला धोका, चष्मा घालून दांडी गुल करण्यात माहिर!
Eng jack leach
Follow us
| Updated on: Jan 26, 2021 | 7:48 AM

नवी दिल्ली :  श्रीलंका दौरा (England Tour Sri Lanka) आटपून इंग्लंड संघ भारत दौऱ्यावर (India vs England) येणार आहे. या दौऱ्यात इंग्लंड टीम इंडिया विरुद्ध कसोटी, टी 20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. इंग्लंडच्या या दौऱ्याची सुरुवात कसोटी मालिकेपासून होणार आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला 5 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. (Ind Vs Eng graeme Swann says jack leach will play important role Against India)

भारतीय भूमीवर कसोटी क्रिकेटमध्ये स्पिनर्सची विशेष भूमिका असते. भारताकडे अश्विनसारखा स्टार फिरकी गोलंदाज आहे तर इंग्लंडचा संघ जॅक लीच आणि डोम बेसच्या फिरकी जोडीसह कसोटी क्रिकेटमध्ये मैदानात उतरेल. श्रीलंकेविरुद्ध नुकत्याच झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या विजयात स्पिनर लीच आणि डोम बेस या जोडीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. इतकंच नाही तर दुसर्‍या कसोटी सामन्याच्या दुसर्‍या डावात जॅक लीचने आपल्या फिरकीची कमाल दाखवताना 4 फलंदाजांना माघारी धाडलं. त्याशिवाय डॉम बेसने दुसऱ्या डावात श्रीलंकेच्या 4 विकेट्स घेऊन 126 धावांवर श्रीलंकेचा डाव संपुष्टात आणला. इंग्लंडचा माजी ऑफस्पिनर ग्रॅमी स्वानच्या मते इंग्लंडच्या भारत दौऱ्यात जॅक लीच महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो.

जॅकने स्टंपच्या सरळ दिशेने गोलंदाजी करायला हवी. त्याने एका बाजूने सातत्याने अशी गोलंदाजी केल्यास आणि दुसऱ्या बाजूने मुख्य गोलंदाज मार्क वूड, जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांनी भेदक मारा केल्यास भारतीय खेळाडूंवर आक्रमण करता येईल. यामुळे इतर फिरकीपटूंना टीम इंडियावर फिरकीने हल्ला चढवता येईल. परिणामी टीम इंडियावर दबाव निर्माण होईल, असं मत ग्रॅमी स्वान याने मांडलं आहे.

“मी टाकलेला चेंडू स्पिन होणार याची मला खात्री असायची, तो चेंडू सपाट खेळपट्टीवरही स्पिन व्हायचा. तुम्ही चांगली गोलंदाजी केली तर भारतीय फलंदाज तुमच्या विरोधात सम्मानाने खेळतात. सध्या टीम इंडियामध्ये वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) नाही. पण विराट कोहली (Virat Kohli) आहे. विराट तो स्पिनरविरोधात खेळताना  गोलंदाज केव्हा खराब डिलीव्हरी टाकतो, याच प्रतिक्षेत असतो”, असं स्वानने म्हटलं. (Ind Vs Eng graeme Swann says jack leach will play important role Against India)

हे ही वाचा

#INDvsENG | टीम इंडियाविरोधातील पहिल्या 2 कसोटींसाठी इंग्लंड संघाची घोषणा

England Tour India | इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाची घोषणा, अजिंक्य रहाणे की विराट कोहली, कर्णधार कोण?

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.