क्रिकेट चाहत्यांना ज्या क्षणाची प्रतिक्षा होती, ती घडी आलीच, ‘या’ स्टार खेळाडूचं कमबॅक

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याआधी टीम इंंडियासाठी आनंदाची बातमी आहे. टीम इंडियाचा फॉर्ममध्ये असलेला युवा खेळाडू फीट झाला आहे.

क्रिकेट चाहत्यांना ज्या क्षणाची प्रतिक्षा होती, ती घडी आलीच, या स्टार खेळाडूचं कमबॅक
indian team
| Updated on: Feb 14, 2023 | 10:48 PM

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याआधी टीम इंंडियासाठी आनंदाची बातमी आहे. टीम इंडियाचा फॉर्ममध्ये असलेला युवा खेळाडू फीट झाला आहे. दुखापतीतून तो सावरला असून आता भारतीय संघासोबत जोडला जाणार आहे. बीसीसीआयने याबाबत पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. बंगळुरू क्रिकेट अकॅडमीमधून खेळाडू फीट झाला असून बीसीसीआयने त्याला खेळण्याची परवानगी दिली आहे.

टीम इंंडियातील हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून श्रेयस अय्यर आहे. अय्यर गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघात मधल्या क्रमांकावर खेळण्यासाठी येत आहे. इतकंच नाहीतर त्याने गतवर्षी भारताकडून कसोटीमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. अय्यरला दुखापत झाल्याने त्याच्या जागी सूर्यकुमार यादवला पदार्पणाची संधी देण्यात आली मात्र तो धावा करण्यात अपयशी ठरला. त्यामुळे निवडकर्त्यांना मोठा पेच पडला असावा.

 

श्रेयस अय्यरच्या येण्यामुळे भारतीय संघाची मधली फळी मजबूत होणार आहे. अय्यरने न्यूझीलंडविरुद्धच्या पदार्पणाच्या कसोटीच्या पहिल्या डावात श्रेयस अय्यरने शानदार शतक झळकावले. 7 कसोटी सामन्यांच्या 12 डावांमध्ये 56.72 च्या उत्कृष्ट सरासरीने एकूण 624 धावा केल्या आहेत.

दरम्यान, कर्णधार रोहित शर्मा आणि टीम मॅनेजमेंटसमोर आता मोठा पेच निर्माण होणार आहे. नागपूर कसोटीमध्ये संधी देण्यात आलेल्या सूर्यकुमारला बाहेर बसवावं लागेल. तरच श्रेयस अय्यरला भारताकडून मधल्या फळीमध्ये स्थान देण्यात येईल.

टीम इंडिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी दोन्ही संघ:

रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (उपकर्णधार), शुहमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, अक्षर पटेल , कुलदीप यादव , रवींद्र जडेजा , मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज आणि उमेश यादव.

पॅट कमिन्स (कर्णधार), डेविड वॉर्नर, एश्टोन एगर, स्कॉट बोलँड, एलेक्स कॅरी, कॅमरन ग्रीन, जोश हेझलवुड, पीटर हॅंडस्कॉम्ब, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, लांस मॉरिस, टॉड मरफी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क आणि मिशेल स्वीपसन.