क्रिकेट विश्वातून मोठी बातमी! जसप्रीत बुमराह याच्यासंदर्भात अपडेट समोर

भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. त्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन भयंकर वाढलं आहे.

क्रिकेट विश्वातून मोठी बातमी! जसप्रीत बुमराह याच्यासंदर्भात अपडेट समोर
| Updated on: Feb 14, 2023 | 6:55 PM

मुंबई : भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारतामधील चालू असलेल्या कसोटी मालिकेसह आणि वनडे मालिकेतून बाहेर झाल्याचं समजत आहे. पीटीआयच्या माहितीनुसार, बीसीसीआय बुमराहबाबत कोणतीही मोठी जोखीम घेणार नाही. आगामी कसोटी वर्ल्ड कप फायनल आणि एकदिवसीय वर्ल्ड कप या दोन मोठ्या स्पर्धा लक्षात घेता बीसीसीआयने सावध पवित्रा घेतला आहे.

भारतीय संघाचा स्टार खेळाडू हा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर झाला आहे. त्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन भयंकर वाढलं आहे. टीम इंडियाचा यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह बॉर्डर गावसकर कसोटीतून कायमचा आऊट झाला आहे. याआधी बुमराहची ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या 2 कसोटींसाठी दुखापतीमुळे निवड करण्यात आली नव्हती. दोन कसोटी सामन्यानंतर बुमराह तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीमध्ये खेळताना दिसेल अशी आशा क्रिकेट चाहत्यांना होती. मात्र आता या आशेवरी पाणी फेरलं जाणार आहे.

जसप्रीत बुमराह सप्टेंबर 2022 पासून मैदानापासून बाहेर आहे. पाठीच्या दुखापतीमुळे बुमराहला अनेक मालिकांना मुकावं लागलं आहे. कसोटीनंतर होणाऱ्या एकदिवसीय मालिकेलाही बुमराह खेळणार नसल्याची माहिती समजत आहे. इतकंच नाहीतर रोहितनेही बुमराहबाबत निष्काळजीपणा करणं योग्य ठरणार नसल्याचं म्हटलं होतं.

 

बुमराहला मालिकेमधून बाहेर ठेवणं हेच योग्य ठरले. तो नेटमध्ये गोलंदाजी करत असताना त्याच्या उजव्या हाताला ताण आला आला. आधीच तो दुखापतीमधून कव्हर होत असताना त्याला परत वर्ल्ड कपआधी दुखापत झाल्याने त्याची काळजी घ्यायला हवी, असं रोहित शर्माने म्हटलं आहे.

दुसरीकडे क्रिकेटचे चाहते त्याला मैदनात पुन्हा पाहण्यासाठी मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र बुमराहला दिवसेंदिवस दुखापतींनी चांगलंच जखडून ठेवल्याचं दिसत आहे. त्यामुळे एका स्टार प्लेअरला मोठ्या सामन्यांपासून मुकावं लागत आहे. याचा भारतीय संघालाही मोठा धक्का बसत आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे सीरिजचं वेळापत्रक

  1. पहिली वनडे, शुक्रवार 17 मार्च, वानखेडे स्टेडियम, मुंबई
  2. दुसरी वनडे, रविवार 19 मार्च, विशाखापट्टणम
  3. तिसरी वनडे, 22 मार्च, बुधवार, एम ए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई