IND vs BAN: पहिल्या वनडेतील पराभवाचा बदला टीम इंडिया घेणार का ? आजच्या टीममध्ये बदल होण्याची शक्यता

| Updated on: Dec 07, 2022 | 8:22 AM

दुसऱ्या मॅचसाठी टीम इंडियामध्ये मोठा बदल होण्याची शक्यता, या खेळाडूला मिळणार संधी

IND vs BAN: पहिल्या वनडेतील पराभवाचा बदला टीम इंडिया घेणार का ? आजच्या टीममध्ये बदल होण्याची शक्यता
ROHIT SHARMA
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई : टीम इंडियाचा (IND) बांगलादेशविरुध्द (BAN) आज दुसरा एकदिवसीय सामना होणार आहे. साडेअकरा वाजल्यापासून टीम इंडियाच्या चाहत्यांना हा सामना पाहता येणार आहे. आजचा सामना टीम (Today Match) इंडियासाठी अधिक महत्त्वाचा आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात टीम इंडिया कशी खेळी करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंनी पहिल्या एकदिवसीय सामन्यात खराब फिल्डींग केली. त्यामुळे टीम इंडियाचा पराभव झाला.

टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यात आजच्या सामन्यात संघर्ष पाहायला मिळणार आहे. कारण बांगलादेश आजचा सामना जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न करणार आहे. तसेच टीम इंडिया सुद्धा पहिला सामन्यात पराभव झाल्यामुळे हो सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

आजच्या सामन्यात टीम इंडियामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. पहिल्या मॅचमध्ये अक्षर पटेल पुर्णपणे तंदुरुस्त नव्हता, त्यामुळे त्याला टीम इंडियामध्ये संधी देण्यात आली नव्हती. त्याला आजच्या सामन्यामध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. तसेच शार्दूल ठाकूर हा सराव करीत असताना जखमी झाला आहे. त्यामुळे त्याच्या जागेवर उमरान मलिक याला संधी मिळण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, कुलदीप सेन, उमरान मलिक.

बांगलादेशची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

लिटन दास (कर्णधार, यष्टिरक्षक), नजमुल हुसेन शांती, यासिर अली, आसिफ हुसैन, महमुदुल्लाह रियाद, मेहदी हसन मिराज, शकीब अल हसन, मुस्तफिजुर रहमान, नमस अहमद, इबादत हुसेन.