Ind vs Eng 2021 | टीम इंडियाविरोधातील कसोटी मालिकेसाठी इंग्लंडचे स्टार खेळाडू भारतात दाखल

| Updated on: Jan 24, 2021 | 2:52 PM

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला 5 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे.

Ind vs Eng 2021 | टीम इंडियाविरोधातील कसोटी मालिकेसाठी इंग्लंडचे स्टार खेळाडू भारतात दाखल
बेन स्टोक्स
Follow us on

मुंबई :  कांगारुंना त्यांच्यात भूमित पराभूत केल्यानंतर टीम इंडिया इंग्लंडला (England Tour India 2021) धोबीपछाड देण्यासाठी सज्ज आहे. इंग्लंड टीम भारत दौऱ्यावर येणार आहे. कसोटी मालिकेपासून या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडचे स्टार खेळाडू भारतात दाखल झाले आहेत. ऑलराऊंडर बेन स्टोक्स (Ben Stockes) आणि वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra Archer) भारतात पोहचलेत. स्टोक्सने विमानातील फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. भारतीयांनो आपण लवकरच भेटुया, अशी कॅपशन या फोटोला दिली आहे. (ind vs eng 2021 ben stockes arrives in India for Test series)

सध्या इंग्लंडचा संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात टेस्ट सीरिज खेळण्यात येत आहे. पाहुण्या इंग्लडने यजमान श्रीलंकेवर पहिल्या सामन्यात विजय मिळवला. तर दुसरा सामना खेळला जात आहे. या सामन्यानंतर इंग्लंडचा उर्वरित संघ भारतात येणार आहे. स्टोक्स आणि आर्चर यांना श्रीलंकेविरोधातील कसोटीसाठी विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे हे दोघे आधी दाखल झाले आहेत.

बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर हे इंग्लंडचे महत्वाचे खेळाडू आहेत. स्टोक्स ऑलराऊंडर आर्चर प्रमुख गोलंदाज आहे.यामुळे टीम इंडियासमोर या दोघांचे तगडे आव्हान असणार आहे.

या कसोटी मालिकेला 5 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. एकूण 4 सामन्यांची ही मालिका असणार आहे. या मालिकेतील पहिल्या 2 सामन्यांसाठी दोन्ही संघाची घोषणा करण्यात आली आहेत. हे दोन्ही सामने चेन्नईमध्ये खेळण्यात येणार आहेत. यानंतरचे उर्वरित 2 सामन्यांचं अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियममध्ये आयोजन केलं आहे.

प्रेक्षकांना परवानगी नाही

चेन्नईतील या 2 कसोटींसाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळणार नाही. तामिळनाडू क्रिकेट बोर्डाने (Tamil Nadu Cricket Association) हे 2 सामने प्रेक्षकांविनाच खेळवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे क्रिकेट चाहत्यांना स्टेडियममध्ये उपस्थित राहून सामन्याचा आनंट लुटता येणार नाही.

टीम इंडिया क्वारंटाईन

“कसोटी मालिकेच्या आठवडाभराआधी टीम इंडियाचे खेळाडू क्वारंटाईन राहणार आहेत. या दरम्यान इंग्लंडविरोधात रणनिती आखणार, अशी माहिती बोलिंग कोच भरत अरुण (Bharat Arun)यांनी दिली.

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना – चेन्नई – 5 ते 9 फेब्रुवारी
दुसरा सामना – चेन्नई – 13 ते 17 फेब्रुवारी
तिसरा सामना – अहमदाबाद – 24 ते 28 फेब्रुवारी
चौथा सामना – अहमदाबाद – 4 ते 8 मार्च

पहिल्या 2 कसोटींसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रिद्धीमान साहा, हार्दिक पंड्या, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्सर पटेल.

टीम इंडियाविरोधातील पहिल्या 2 टेस्टसाठी इंग्लंड टीम : जो रूट (कप्तान), रोरी बर्न्स, डॉम सिबले, बेन स्टोक्स, जॉस बटलर, जोफ्रा आर्चर, मोईन अली, जॅक क्रॉले, ओली स्टोन, ख्रिस वोक्स, बेन फोक्स, जेम्स एंडरसन, डॉम बेस, डॅन लॉरेन्स, स्टुअर्ट ब्रॉड आणि जैक लीच.

संबंधित बातम्या :

#INDvsENG | टीम इंडियाविरोधातील पहिल्या 2 कसोटींसाठी इंग्लंड संघाची घोषणा

England Tour India | इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाची घोषणा, अजिंक्य रहाणे की विराट कोहली, कर्णधार कोण?

(ind vs eng 2021 ben stockes arrives in India for Test series)