#INDvsENG | टीम इंडियाविरोधातील पहिल्या 2 कसोटींसाठी इंग्लंड संघाची घोषणा

| Updated on: Jan 22, 2021 | 11:03 AM

कसोटी मालिकेला 5 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे.

#INDvsENG | टीम इंडियाविरोधातील पहिल्या  2 कसोटींसाठी इंग्लंड संघाची घोषणा
टीम इंडियाविरोधातील पहिल्या 2 कसोटींसाठी इंग्लंड संघाची घोषणा
Follow us on

मुंबई : टीम इंडियाविरोधातील पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठी (Team India) इंग्लडच्या 16 सदस्यीय (England Cricket Team) संघाची घोषणा करण्यात आली आहे. जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्स आणि सलामीवीर रोरी बर्न्सचे संघात पुनरागमन झालं आहे. या खेळाडूंना श्रीलंकाविरोधातील मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली होती. तसेच या 2 कसोटींसाठी जॉनी बेअरस्टो, सॅम करन आणि मार्क वुड यांना संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. तसेच ओली पोप दुखापतीतून सावरल्यावर संघासोबत जोडला जाईल, अशी माहिती इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिली. तसेच जेम्स ब्रेसी, मॅसन क्रेन, साकिब महमूद, मॅट पार्किंसन, ऑली रोबिन्सन आणि अमर विर्दी यांना राखीव खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे.  (ind vs eng test series england announced squad for first 2 test match against team india)

तसेच विकेटकीपर फलंदाज जोस बटलर पहिल्या कसोटीनंतर इंग्लंडला परतणार आहे. यामुळे दुसऱ्या कसोटीत बेन फोक्सला यष्टीरक्षण करण्याची संधी मिळू शकते. मोईन अली, जॅक लीच आणि डॉम बेस यांच्या खांद्यावर फिरकी गोलंदाजीची जबाबदारी असणार आहे. तर जोफ्रा आर्चर, ख्रिस वॉक्स, जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड आणि ख्रिस ऑली यांच्याकडे वेगवान बोलिंगची धुरा असणार आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच इंग्लंडविरोधातील या टेस्ट सीरिजमधील पहिल्या 2 सामन्यांसाठी 16 सदस्यीय टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. कर्णधार विराट कोहली आणि फास्टर बोलर इशांत शर्माचं संघात पुनरागमन झालं आहे. तसेच शुबमन गिल, मोहम्मद सिराज आणि हार्दिक पांड्यालाही संधी देण्यात आली आहे.

5 फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेला सुरुवात

या 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेला 5 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना 5-9 फेब्रुवारी तर दुसरा सामना हा 13-17 फेब्रुवारीदरम्यान खेळण्यात येणार आहे. हे दोन्ही सामन्यांचे आयोजन चेन्नईतील (MA Chidambaram Stadium) वर करण्यात आले आहे.

असा आहे इंग्लंड भारत दौरा

इंग्लंड या दौऱ्यात भारताविरोधात कसोटी, टी 20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. यामध्ये 4 कसोटी, 5 टी 20 आणि 3 एकदिवसीय सामने खेळण्यात येणार आहेत.

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना – चेन्नई – 5 ते 9 फेब्रुवारी
दुसरी कसोटी – चेन्नई – 13 ते 17 फेब्रुवारी
तिसरी टेस्ट – अहमदाबाद – 24 ते 28 फेब्रुवारी
चौथा सामना – अहमदाबाद – 4 ते 8 मार्च

पहिल्या 2 कसोटींसाठी इंग्लंडचा संघ : जो रूट (कप्तान), रोरी बर्न्स, डॉम सिबले, बेन स्टोक्स, जॉस बटलर, जोफ्रा आर्चर, मोईन अली, जॅक क्रॉले, ओली स्टोन, ख्रिस वोक्स, बेन फोक्स, जेम्स एंडरसन, डॉम बेस, डॅन लॉरेन्स, स्टुअर्ट ब्रॉड आणि जैक लीच

पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठीची टीम इंडिया : रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रिद्धीमान साहा, हार्दिक पंड्या, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्सर पटेल

संबंधित बातम्या :

England Tour India | इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाची घोषणा, अजिंक्य रहाणे की विराट कोहली, कर्णधार कोण?

England Tour India | ना जाडेजा, ना विहारी, तरीही इंग्लंडविरुद्ध भारताची मधळी फळी तुफानी!

(ind vs eng test series england announced squad for first 2 test match against team india)