IND vs NZ : विकेट मिळत नाहीयत, त्यात आकाश दीपने मैदानात इतकी घोडचूक केली, तर शुबमन गिल का नाही चिडणार?
IND vs NZ : 'हे लक्षात ठेवा' असं कॉमेंट्री करताना न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू इयान स्मिथ म्हणाला. आकाश दीपमुळे हातात आलेली विकेट घेण्याची संधी हुकली. त्यामुळे भारतीय कॅप्टन शुबमन गिल चांगलाचं चिडला.

भारत-न्यूझीलंडमध्ये वेलिंगटनच्या बेसिन रिजर्ववर टेस्ट सीरीजचा पहिला कसोटी सामना सुरु आहे. आज कसोटीचा पाचवा दिवस आहे. पाचव्यादिवशी फिल्डिंग करताना आकाश दीपकडून मोठी चूक झाली. न्यूझीलंडचा फलंदाज डेरिल मिचेलच्या रनआऊटची संधी हुकली. तो अर्ध्या विकेटपर्यंत पोहोचला होता. न्यूझीलंडच्या इनिंगमध्ये 74 व्या ओव्हरमध्ये ही घटना घडली. वॉशिंग्टन सुंदरचा पहिला चेंडू डेरिल मिचेल मिड-ऑनच्या दिशेने खेळला. मिचेल धावा घेण्यासाठी पळाला. पण टॉम ब्लंडेल आपल्या जागेवरुन हलला नाही. मिचेल अर्ध्या विकेटपर्यंत पोहोचला होता. आकाश दीपकडे चेंडू हातात पकडून रन आऊट करण्याची संधी होती. पण तो चेंडू व्यवस्थित पकडू शकला नाही. मिचेल पुन्हा क्रीजमध्ये पोहोचला.
‘हे लक्षात ठेवा’ असं कॉमेंट्री करताना न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू इयान स्मिथ म्हणाला. आकाश दीपमुळे हातात आलेली विकेट घेण्याची संधी हुकली. त्यामुळे भारतीय कॅप्टन शुबमन गिल चांगलाचं चिडला. विकेटकीपर ऋषभ पंतचा सुद्धा संयम सुटला. त्याचाही पारा चढला.
तिसऱ्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी
भारतीय टीमला पाचव्यादिवशी पहिल्या सेशनमध्ये दोन महत्वाचे विकेट मिळाले. वॉशिंग्टन सुंदरने ओपनर डेवोन कॉन्वेला ऋषभ पंतकरवी कॅचआऊट केलं. प्रसिद्ध कृष्णाने रचिन रवींद्रला केएल राहुल करवी कॅचआऊट केलं. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी केली.
भारतीय टीमचं टेन्शन वाढवलं
डेवोन कॉन्वेने संयमाने बॅटिंग केली. दुसरीकडे रवींद्रने सुद्धा भारतीय वेगवान गोलंदाजांच्या सुरुवातीच्या स्पेलचा सामना केला. पाचव्या दिवशी न्यूझीलंडची टीम 233 रन्स पिछाडीवर होती. विकेट वाचवून जास्तीत वेळ खेळपट्टिवर टिकण्याची रणनिती होती. अंशुल कम्बोजने टॉम ब्लंडेलला यष्टीपाठी कॅचआऊट करुन पाचव्या विकेटसाठीची भागीदारी संपवली. त्यानंतर डॅरेल मिचेल आणि ग्लेन फिलिप्सने सहाव्या विकेटसाठी शानदार भागीदारी करुन भारतीय टीमचं टेन्शन वाढवलं.