IND vs NZ : दर्जेदार आऊटस्विंग गोलंदाजी, आधी रोहित शर्मा मग इशान किशनने माती खाल्ली, बिचारा आकिब नबी VIDEO
IND vs NZ : टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये चौथा वनडे सामना सुरु आहे. भारतीय क्रिकेट संघ या वनडे सीरीजमध्ये 2-0 ने आघाडीवर आहे. आजचा सामना न्यूझीलंडसाठी जास्त महत्वाचा आहे. तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला होता.

IND vs NZ 4th ODI : भारत आणि न्यूझीलंडमध्ये आज चौथा वनडे सामना सुरु आहे. या मॅच मध्ये भारताचा वेगवान गोलंदाज आकिब नबीचं नशीब खूप खराब निघालं. मॅचच्या सुरुवातीलाच आकिब नबीच्या पहिल्या ओव्हरमध्ये नाट्यमय घडामोडी पहायला मिळाल्या. मॅचमध्ये दुसरी ओव्हर होती. नबीने त्याच्या ओव्हरच्या पहिल्या चार चेंडूंवर 12 धावा दिल्या. नंतर शानदार कमबॅक केलं. शेवटच्या दोन चेंडूंवर त्याला दोन विकेट मिळाल्या असत्या. चांगली संधी होती. पण भारतीय फिल्डर्सच्या चुकीने त्याच्या मेहनतीवर पाणी फिरवलं.
न्यूझीलंडच्या इनिंगमध्ये दुसरी ओव्हर सुरु होती. आकिब नबीच्या अचूक स्विंग गोलंदाजीने ओपनर विलं यंगला पूर्णपणे चकवलं. पण स्लिपमध्ये उभ्या असलेल्या रोहित शर्मा आणि विकेटकिपर ईशान किशनने कॅच घेण्याच्या सोप्या संधी सोडल्या. पहिल्या चार चेंडूत धावा दिल्यानंतर आकिब नबीने आपल्या गोलंदाजीची दिशा आणि टप्प्यामध्ये सुधारणा केली. ओव्हरच्या शेवटच्या दोन चेंडूंवर कॅच घेण्याची संधी होती. पण दोन्हीवेळी कॅच ड्रॉप झाली.
सुंदर गुड लेंथ चेंडू टाकला
ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर आकिब नबीने ऑफ स्टम्पच्या बाहेर सुंदर गुड लेंथ चेंडू टाकला. विल यंगने जागेवरुनच चेंडू मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅटची कड घेऊन थेट स्लिपमध्ये उभ्या असलेल्या रोहित शर्माकडे गेला. पण रोहितच्या हातून एक सोपा झेल सुटला.
एकही विकेट मिळू शकला नाही
पाचव्या चेंडूवर कॅच ड्रॉप झाल्यानंतर आकिबने हार मानली नाही. पुन्हा त्याने सुंदर आऊटस्विंगर टाकला. विल यंगने ड्राइव्ह मारण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी तो पुढे आला. पण चेंडू बॅटची कड घेऊन विकेटकिपर इशान किशनकडे गेला. ईशान किशनने डाइव्ह मारुन ही कॅच पकडण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू त्याच्या ग्लोव्हजमधून सुटला होता. अशा प्रकारे एकाच ओव्हरमध्ये विल यंगला दोन जीवनदानं मिळाली. आकिब नबीला एकही विकेट मिळू शकला नाही.