IND vs NZ सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! दोन खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमक, विराट कोहलीने केली मध्यस्थी; Video Viral

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चौथ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान, मैदानावर दोन खेळाडूंमध्ये जोरदार वाद झाला. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून विराट कोहलीने हस्तक्षेप केला आणि परस्थिती नियंत्रणात आली.

IND vs NZ सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! दोन खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमक, विराट कोहलीने केली मध्यस्थी; Video Viral
Gurnoor Brar vs Tim Seifert
| Updated on: Nov 13, 2026 | 12:02 PM

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चौथ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) सामना सुरु आहे. या सामन्यातील पहिल्या सत्रात खेळाडूंमधील शाब्दिक चकमक ही फलंदाजी आणि गोलंदाजीइतकीच चर्चेचा विषय ठरली. भारताचा तरुण वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रार आणि न्यूझीलंडचा फलंदाज टिम सायफर्ट यांच्यात वाद झाला. दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्यामुळे मैदानातील वातावरण अचानक तणावपूर्ण बनले. परिस्थिती अधिक चिघळण्याआधीच, विराट कोहलीने त्वरित हस्तक्षेप करत गुरनूर ब्रारला तिथून दूर नेले. यामुळे परस्थिती नियंत्रणात आली.

12 ओव्हरमध्ये झाली बाचाबाची!

श्रेयस अय्यरकडे नेतृत्वाची धुरा आहे. शुभमन गिल सध्या टेस्ट सिरीजच्या तयारी असल्याने संघ श्रेयस अय्यरच्या हातात आहे. न्यूझीलंडचा फलंदाज टिम सायफर्टने सुरवातीपासूनच भारतीय गोलंदाजांविरुद्ध आक्रमक पवित्रा स्वीकारला. त्याने एकापाठोपाठ मोठे आणि आक्रमक फटके मारत आपापले अर्धशतक पूर्ण केले. न्यूझीलंडच्या डावातील १२ व्या षटकादरम्यान गुरनूर ब्रार आणि टिम सायफर्ट यांच्यात वाद झाला.

Loading...

नेमकं काय घडलं?

या सामन्यात, भारतीय संघाला पहिले यश मिळवण्यासाठी १२ व्या षटकापर्यंत वाट पाहावी लागली. अखेर, १२ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर गुरनूरने न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज टिम सायफर्टला बाद केले. यक्ष भारताला हिले यश मिळाले. पण त्यानंतर मात्र मैदानावर एकच गोंधळ झाला. कारण विकेट घेताच गुरनूर ब्रारने अत्यंत आक्रमक पद्धतीने जल्लोष केला. एवढंच नाही तर तो थेट फलंदाजाच्या जवळ जाऊन पोहोचला. त्यानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये चांगलीच शाब्दिक बाचाबाची झाली. टिम सायफर्टने गुरनूर ब्रारच्या चेंडूवर मोठा षटकार मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू नीट बॅटवर न आल्यामुळे यष्टिरक्षक इशान किशनने तो झेलबंद केला.

विराट कोहलीने सांभाळी परस्थिती

मैदानावरील तणावपूर्ण परस्थिती पाहून लगेचच विराट कोहली पुढे आला. त्याने सगळं बिघडयाच्या आधीच गुरनूर ब्रारला पाठी खेचून घेतलं.या दरम्यान पंचांनीही या भारतीय गोलंदाजाला ताकीद दिली.

ICC करणार कारवाई?

आता एकच प्रश्न उरतो की गुरनूर ब्रारच्या या वागणुकीवर ICC कारवाई करणार का? आणि जर कारवाई केली तर काय कारवाई होणार. पहिल्या १० षटकांत अर्धशतक पूर्ण करून, टिम सायफर्टने भारता विरुद्धच्या एकदिवसीय सामन्याच्या सुरुवातीच्या १० षटकांत न्यूझीलंडच्या फलंदाजाद्वारे नोंदवलेल्या सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रमही मोडला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us