IND vs NZ: त्या 6 चेंडूंमुळे गेमच फिरला, हेन्री वादळाचा जोरदार तडाखा; भारतीय फलंदाजीच्या चिंधड्या उडवल्या!

भारत-न्यूझीलंड वनडे सामन्यात भारताला 244 धावांनी मोठा पराभव पत्करावा लागला. भारतीय संघ अवघ्या 89 धावांत गारद झाला. मॅट हेन्रीच्या भेदक गोलंदाजीने पहिल्याच षटकात रोहित, कोहली, अय्यरला बाद करत भारतीय फलंदाजीचा कणा मोडला. हा भारताचा वनडेतील सर्वात मोठा पराभव ठरला, हेन्रीचे 6 चेंडू गेम चेंजर ठरले.

IND vs NZ: त्या 6 चेंडूंमुळे गेमच फिरला, हेन्री वादळाचा जोरदार तडाखा; भारतीय फलंदाजीच्या चिंधड्या उडवल्या!
IND vs NZ ODI
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 13, 2026 | 5:55 PM

भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज झालेल्या वनडे सीरिजच्या चौथ्या सामन्यात भारताला 244 धावांनी पराभव स्वीकारावा लागला आहे. भारताचा हा वनडे क्रिकेटमधील सर्वात मोठा पराभव आहे. न्यूझीलंड विरुद्धचाही भारताचा हा सर्वात मोठा पराभव आहे. 334 धावांचं लक्ष्य गाठताना भारताचे शेर अवघ्या 89 धावातच कोलमडले. भारतीय प्रेक्षकांवर आज आपल्या संघाची सर्वात वाईट कामगिरी पाहण्याची वेळ आली. माऊंट मोनगानुईमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात सर्वात मोठा टर्निंग पॉइंट टीम इंडियाच्या डावातील पहिली ओव्हर ठरली. मॅट हेन्री नावाचं वादळ आज मैदानात घोंघावलं. हेन्री गोलंदाजीला उतरला आणि त्याने भारतीय फलंदाजीच्या चिंधड्या चिंधड्या उडवल्या. याच ओव्हरमध्ये भारताच्या पराभवावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

पहिलीच ओव्हर टर्निंग पॉइंट

न्यूझीलंडने फलंदाजी घेताना संपूर्ण 50 ओव्हर खेळून 333 धावा कुटल्या होत्या. त्यामुळे धावांचा डोंगर पार करण्यासाठी टीम इंडिया तडाखेबाज सुरुवात करेल, अशी आशा होती. पण तसं झालं नाही. समोर मॅट हेन्री काळ बनून उभा होता. हेन्रीने पहिल्याच ओव्हरमध्ये भारताची टॉप ऑर्डरच नेस्तनाबूत करून टाकली. ओपिनिंग करण्यासाठी आलेल्या रोहित शर्माला कीव्ही पेसरने पहिल्याच चेंडूत बाद करून आला तसा तंबूत पाठवला. रोहित पव्हेलियनमध्ये गेल्यावर विराट कोहलीने मैदानाचा ताबा घेतला. त्याने तीन चेंडूंचा सामनाही केला. पण हेन्रीने त्याला षटकाच्या पाचव्या चेंडूवर असं काही फसवलं की विराट क्लिन बोल्ड झाला.

Loading...

लागोपााठ दोन बडे खेळाडू तंबूत परतल्यावर भारताला मोठा झटका बसला होता. हेन्रीचं वादळ एवढ्यावरच थांबणार नव्हतं. त्याने त्याच षटकातील शेवटच्या चेंडूवर कार्यवाहक कर्णधार श्रेयस अय्यरला बाद करून पव्हेलियनमध्यचे जायला भाग पाडलं. अय्यर पायचीत झाला. या तिन्ही फलंदाजांनी खातंही खोललं नाही. धक्कादायक म्हणजे पहिली ओव्हर संपली तेव्हा भारताचा स्कोअर शून्य होता. भारताच्या वाट्याला क्वचितच अशी वेळ आली असेल. तीन खेळाडू बाद झाल्यानंतर भारतीय खेळाडूंनी नंतर मानच वर काढली नाही.

9 धावा अन् 4 बळी

भारतीय संघाने केवळ 9 धावा काढल्या तेव्हा टीम इंडियाचे 4 गडी बाद झाले होते. रुतुराज गायकवाडची बॅटही फार जादू करू शकली नाही. तोही 5 धावा करून स्टेडियमच्या बाहेर गेला. नंतर आलेल्या इशान किशन आणि अक्षर पटेलने लाज राखण्याचा प्रयत्न केला. पण मॅथ्यू फिशरने भारताला पाचवा झटका दिला. टीम इंडियाच्या 53 धावा झाल्या होत्या. तेव्हा अक्षरने 36 चेंडूत 21 धावा केल्या होत्या. तर इशानने 53 चेंडूत 27 धाव केल्या होत्या. 27 धावांवर तोही बाद झाला. आता भारताचा स्कोअर 61/6 झाला होता.

हेन्री नावाचं वादळ

न्यूझीलंडच्या दमदार गोलंदाजीपुढे भारताचा एकही खेळाडू टिकू शकला नाही. भारताला 100 धावाही करता आल्या नाहीत. शेवटचे चार विकेटही 28 धावांच्या आतच पडले होते. अकीब नबी आणि कुलदीप यादव यांचा कारभार स्वस्तात आटोपला होता. नमन धीरने 24 चेंडूत 21 धावा केल्या. नंतर त्याला मॅथ्यू फिशरने बाद केलं. गुरनूर बरारने दोनच धावा केल्या. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने सर्वोत्तम कामगिरी केली. त्याने 9.4 ओव्हरमध्ये केवळ 27 धावा देऊन 6 गडी घेतले तर मॅथ्यू फिशरने 3 विकेट काढले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us