IND vs PAK T20 WC: भारत-पाकिस्तान सामन्याची जबरदस्त क्रेझ, तिकीट खरेदीत चाहत्यांचा विक्रम

काही मिनिटामध्ये पाच लाख क्रिकेट चाहत्यांनी तिकीट खरेदी केली आहे.

IND vs PAK T20 WC: भारत-पाकिस्तान सामन्याची जबरदस्त क्रेझ, तिकीट खरेदीत चाहत्यांचा विक्रम
T20 World Cup 2022
Image Credit source: icc
| Updated on: Sep 16, 2022 | 9:31 AM

ऑस्ट्रेलियात (Australia)  होणाऱ्या विश्वचषकाची (T20 World Cup 2022) सगळ्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. कारण विश्वचषक स्पर्धेत आत्तापर्यंत सगळ्या खेळाडूंचा संघर्ष पाहायला मिळाला आहे. विशेष म्हणजे आशिया चषकात सगळे सामने रोमांचक झाले आहेत. सगळ्या चाहत्यांच्या नजरा आता 23 ऑक्टोबरची आतुरतेने वाट पाहत आहेत. कारण त्या दिवशी भारत आणि पाकिस्तान यांच्यात मॅच होणार आहे. चाहत्यांनी तिकीट (Ticket) खरेदीमध्ये सुद्धा विक्रम केला आहे.

भारत आणि पाकिस्तान हे शेजारी देश असल्यामुळे क्रिकेट मैदानात चाहते खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी जात असतात. प्रत्येक क्रिकेट मॅचवेळी दोन्ही संघात हे पाहायला मिळतं. यावेळी 82 देशाच्या क्रिकेट रसिकांनी तिकीट खरेदी केल्याची माहिती मिळाली आहे.

काही मिनिटामध्ये पाच लाख क्रिकेट चाहत्यांनी तिकीट खरेदी केली आहे. त्यामुळे भारत पाकिस्तान क्रिकेट मॅचचं बुकींग फुल्ल झालं आहे.

T20 विश्वचषक 2022 मध्ये भारताचे या दिवशी होणार सामने

भारत विरुद्ध पाकिस्तान, 23 ऑक्टोबर (मेलबर्न)

भारत विरुद्ध अ गट उपविजेता, 27 ऑक्टोबर (सिडनी)

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 30 ऑक्टोबर (पर्थ)

भारत विरुद्ध बांगलादेश, 2 नोव्हेंबर (अ‍ॅडलेड)

भारत विरुद्ध गट ब विजेता, 6 नोव्हेंबर (मेलबर्न)

T20 विश्वचषक 2022 साठी भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (डब्ल्यूके), दिनेश कार्तिक (डब्ल्यूके), हार्दिक पंड्या, आर.के. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

स्टँडबाय खेळाडू: मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर.