Rohit Sharma | हिटमॅन रोहित शर्मा फिटनेस टेस्ट पास

| Updated on: Dec 11, 2020 | 1:14 PM

आयपीएलच्या 13 व्या मोसमादरम्यान रोहितच्या मांडीचे स्नायू दुखावले गेले होते. यामुळे त्याला ऑस्ट्रेलियाविरोधातील एकदिवसीय आणि टी 20 मालिकेला मुकावे लागले.

Rohit Sharma | हिटमॅन रोहित शर्मा फिटनेस टेस्ट पास
Follow us on

बंगळुरु : एकदिवसीय आणि टी 20 मालिकेनंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 सामन्यांची कसोटी मालिका (India Tour Australia 2020-21)  खेळणार आहे. या कसोटी मालिकेआधी टीम इंडियाला दिलासा मिळाला आहे. टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्मा फिटनेस टेस्ट पास झाला आहे. त्यामुळे टीम इंडियाला मोठा दिलासा मिळाला आहे. एएनआयने याबाबत ट्विटद्वारे माहिती दिली आहे. ही टेस्ट (NCA) राष्ट्रीय क्रिकेट एकॅडमीमध्ये घेण्यात आली. या टेस्टदरम्यान एनसीएप्रमुख राहुल द्रविड (Rahul Dravid) उपस्थित होता.  india tour australia 2020 hitman rohit sharma passes fitness test

दुखापतीमुळे हिटमॅन रोहित शर्माला (Rohit Sharma) एकदिवसीय आणि टी 20 मालिकेत स्थान मिळाले नव्हते.  मात्र आता रोहितने फिटनेस टेस्ट पास केली आहे. त्यामुळे रोहितचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

12 डिसेंबरला ऑस्ट्रेलियाला जाणार?

रोहित फिटनेस टेस्ट पास  झाल्याने तो त्वरित ऑस्ट्रेलियाला पाठवण्याची शक्यता आहे. रोहितला 12 डिसेंबरला म्हणजेच उद्या ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात येऊ शकते. मात्र याबाबत अजूनही कोणतीच माहिती देण्यात आली नाहीये.   ऑस्ट्रेलियाला पोहचल्यानंतर रोहितला टीम इंडियासोबत जुडता येणार नाही. कोरोना नियमांमुळे रोहितला टीम इंडियासोबत जुडता येणार नाही. ऑस्ट्रेलियाला पोहचल्यानंतर 14 दिवस क्वारंटाईन रहावे लागणार आहे. क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाल्यानंतरच रोहितला सरावासाठी मैदानात उतरता येईल.

सरावासाठी रोहितकडे कमी वेळ

रोहितला ऑस्ट्रेलियाला रवाना झाल्यानंतर 14 दिवस क्वारंटाईन रहावे लागेल. म्हणजेच जवळपास रोहितला संपूर्ण डिसेंबर महिना असाच निघून जाईल. रोहितचा तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यासाठी समावेश करण्यात आला आहे. तिसरा कसोटी सामना 7 जानेवारी 2021 मध्ये खेळण्यात येणार आहे. त्यामुळे या सामन्यासाठी रोहितकडे सराव करण्यासाठी वेळ फार कमी आहे.

“रोहितमुळे टीम इंडियाला मजबुती मिळेल”

रोहितला ऑस्ट्रेलियाला पाठवण्याच्या मुद्द्यावरुन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने समर्थन केलं. “रोहित जर फिट असेल, तर त्याला नक्कीच ऑस्ट्रेलियाला पाठवायला हवं”, असं सचिन म्हणाला. सचिन एएनआय वृत्तसंस्थेशी बोलत होता. विराट पहिल्या कसोटी नंतर मायदेशी परतणार आहे. विराटच्या अनुपस्थितीत रोहित जोडला गेल्यास, टीम इंडियाला मजबूती मिळेल, असा आशावाद सचिनने व्यक्त केला.

आयपीएलच्या 13 व्या मोसमात दुखापत

रोहितला आयपीएलच्या 13 व्या मोसमात हॅमस्ट्रिंग इंज्युरी झाली. म्हणजेच त्याच्या मांडीचे स्नायू दुखावले होते. यामुळे रोहितला एकदिवसीय आणि टी 20 मालिकेला मुकावे लागले. दरम्यान आता रोहितच्या फिटनेस टेस्टचा निकाल काय येतो, याकडे सर्व क्रिकेट चांहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

संबंधित बातम्या :

PHOTO | ‘विरुष्का’च्या लग्नाला 3 वर्षे पूर्ण, पाहा त्यांच्या सहजीवनाचा प्रवास…

india tour australia 2020 hitman rohit sharma passes fitness test