तुझं आणि माहीचं नातं फक्त 2 शब्दात सांग, फॅन्सच्या प्रश्नावर विराटचं ‘हृदय’ जिंकणारं उत्तर!

| Updated on: May 30, 2021 | 7:47 AM

धोनीच्या नेतृत्वाखाली विराटच्या कारकीर्दीची सुरुवात झालीय तर विराटच्या नेतृत्वाखाली धोनीने कारकीर्दीतील अखेरची मॅच खेळलीय. (india Tour of England WTC Final Virat kohli MS Dhoni relation just 2 Word)

तुझं आणि माहीचं नातं फक्त 2 शब्दात सांग, फॅन्सच्या प्रश्नावर विराटचं हृदय जिंकणारं उत्तर!
विराट कोहली आणि एम एस धोनी
Follow us on

मुंबई :  भारतीय क्रिकेट संघासाठी इथून पुढचे काही दिवस महत्त्वाचे असणार आहेत. बीसीसीआयने आयपीएलसंदर्भातील (IPL 2021) उर्वरित सामने यूएईमध्ये खेळविण्याचा (IPL in UAE) निर्णय जाहीर केला आहे. सप्टेंबर-ऑक्टोंबर महिन्यात उर्वरित 31 सामने पार पडणार आहे. तत्पूर्वी भारताला इंग्लंड दौऱ्यावर (India Tour of England) महत्त्वपूर्ण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना (WTC Final) तसंच इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची मालिका (India vs England test Series) खेळायची आहे. त्यासाठी भारतीय संघातले सगळे खेळाडू कोरोनाच्या नियम आणि अटींना अधिन राहून मुंबईत क्वारंटाईन आहे. याचदरम्यान कर्णधार विराट कोहलीला (Virat kohli) चाहत्याने इन्स्टाग्रामवरुन तुझं आणि महेंद्रसिंग धोनीचं (माहीचं) (Mahendra Singh Dhoni) नातं दोन शब्दात सांग, असा प्रश्न केला. त्यावर विराटने त्याला हृदय जिंकणारं उत्तर दिलं. (india Tour of England WTC Final Virat kohli MS Dhoni relation just 2 Word)

विराट मुंबईत क्वारंटाईन

भारतीय कर्णधार विराट कोहली आणि संघातील सहकारी इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी मुंबईच्या एका हॉटेलमध्ये क्वारंटाईन आहेत. यादरम्यान आपल्या फॅन्सशी ऑलनाईन गप्पागोष्टी करण्याचा विराटचा मूड झाला. त्याने इन्स्टाग्रामवरुन तशी सूचना आपल्या चाहत्यांना दिली. साहजिकच चाहत्यांना हेच हवं होतं…. !

विराटचं हृदय जिंकणारं उत्तर

एका फॅन्सने विराटला कोड्यात टाकणारा प्रश्न विचारला. तुझं आणि माहीचं नातं केवळ दोन शब्दात सांग, असा अडचणीचा प्रश्न फॅन्सने विचारला खरा पण विराटने देखील तितक्याच खऱ्या मनाने उत्तर दिलं. ‘माझं आणि माहीचं नातं म्हणजे विश्वास आणि आदर…’ असं हृदय जिंकणारं उत्तर विराटने दिलं.

विराटचं हृदय जिंकणारं उत्तर….

धोनीच्या नेतृत्वाखाली विराटच्या कारकीर्दीची सुरुवात, तर विराटच्या नेतृत्वाखाली धोनीची अखेरची मॅच

कॅप्टन कूल एम एस धोनीच्या नेतृत्वाखाली विराट कोहलीच्या कारकीर्दीची सुरुवात झालीय. 18 ऑगस्ट 2008 साली विराटने श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यावेळी धोनीकडे भारतीय संघाचं नेतत्व होतं. दुसरीकडे विराटच्या नेतृत्वाखाली धोनीने कारकीर्दीतील अखेरचा एकदिवसीय सामना खेळला. धोनीची वर्ल्ड कप 2019 ची न्यूझीलंडविरुद्धची सेमी फायनल मॅच कारकीर्दीतील अखेरची मॅच ठरली. त्यावेळी विराटकडे भारतीय संघाचं नेतृत्व होतं.

(india Tour of England WTC Final Virat kohli MS Dhoni relation just 2 Word)

हे ही वाचा :

Video : IPL मॅचेससाठी चहलची बायको युएईला जाण्यासाठी तयार, BCCI ने घोषणा करताच डान्सचा खास व्हिडीओ शेअर

MS धोनी की विराट कोहली, सर्वोत्तम कर्णधार कोण? इंग्लंडचा माजी कर्णधार म्हणतो…

IPL च्या उर्वरित मॅचमध्ये चेन्नईला फटका तर धोनीला झटका बसणार?, कसा तो पाहा…