India vs Australia 2020 | टीम इंडियाच्या गोलंदाजीचे छक्के-पंजे ठाऊक : ऑस्ट्रेलिया कोच जस्टिन लॅंगर

| Updated on: Nov 25, 2020 | 3:30 PM

27 नोव्हेंबरपासून टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात होत आहे.

India vs Australia 2020 | टीम इंडियाच्या गोलंदाजीचे छक्के-पंजे ठाऊक : ऑस्ट्रेलिया कोच जस्टिन लॅंगर
Follow us on

सिडनी : भारतीय संघ विराट कोहलीच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाविरुद्ध (India Tour Australia 2020) भिडणार आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय, टी 20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे. एकदिवसीय मालिकेपासून या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. यानंतर टी 20 आणि कसोटी मालिका खेळली जाणार आहे. कांगारुंविरुद्ध भिडण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे. तर ऑस्ट्रेलियानेह भारताला तोडीसतोड उत्तर देण्यास कंबर कसली आहे. ऑस्ट्रेलियाचा प्रशिक्षक जस्टिन लॅंगरने (Justin Langer) टीम इंडियाच्या गोलंदाजीबद्दल मोठं विधान केलं आहे. india vs australia 2020 australia coach justin langer big statement about team india bowlers

लॅंगर काय म्हणाले?

“टीम इंडियाकडे चांगले गोलंदाज आहेत. मात्र याच गोलंदाजांचा भारतीय फंलदाजांनी नेट्समध्ये चांगल्या पद्धतीने सामना केला आहे. भारतीय गोलंदाजाचं सन्मान करतो. मात्र त्यांच्या गोलंदाजीचा सामना आम्ही केला आहे. या गोलंदाजांचे सर्व छक्के पंजे अर्थात त्यांच्या सर्व युकत्यांची कल्पना आम्हाला आहे”, असं लॅंगर म्हणाला. लॅंगर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होता. “भारताकडे जसप्रीत बुमराह सारखा विश्वस्तरीय गोलंदाज आहे. तसेच मोहम्मद शमीसारखा गोलंदाज आहे. याबद्दल आम्ही त्यांचा मान राखतो. मात्र आमच्या खेळाडू्ंनीही आयपीएल तसेच मागील काही स्पर्धेत या गोलंदाजांचा सामना केला आहे”, असं लॅंगरने स्पष्ट केलं.

टीम इंडियाच्या गोलंदाजांचा सामना करण्यासाठी सज्ज

“टीम इंडियाची वेगवान आणि फिरकी गोलंदाजी उत्कृष्ट आहे. पण ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनीही खूप तयारी केली आहे. आमच्या खेळाडूंना भारतीय गोलंदाजांची माहिती आहे. प्रत्येक फॉर्मेटनुसार टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर तयार रहायला हवं, हे आमच्या खेळाडूंना माहिती आहे. आमचे खेळाडू फार परिश्रम घेत आहेत. आमच्या खेळाडूंनी टीम इंडियाची गोलंदाजी पाहिली आहे, तसेच त्याचा सामना करण्यासाठी तयारही आहेत”, असं लँगर म्हणाला.

गोलंदाजांमुळे आमचा आत्मविश्वास दृढ

लँगरने त्यांच्या गोलंदाजीच्या आक्रमणाचा उल्लेख केला. “आमच्या गोलंदाजीमध्ये खोली आहे. त्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला आहे. आमच्याकडे मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, जोश हेजलवुड यासारखे गोलंदाज आहेत. तसेच जेम्स पॅटिन्सन, सीन एबोट आणि मायकेल नासरही सज्ज आहेत. कोणत्याही परिस्थितीत आम्ही सज्ज आहोत”, असा आशावादही लॅंगरने यावेळेस व्यक्त केला.

आमच्याकडे फॅब्युलस फाईव्ह खेळाडू : रवी शास्त्री

“मी टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजीबद्दल आश्वस्त आहे. आमच्याकडे जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि नवदीप सैनी असे एकूण फॅब्युलस फाईव्ह गोलंदाज आहेत. उमेश अनुभवी आहे. नवदीप सैनी तरूण आहे. तसेच त्याच्याकडे वेगाने गोलंदाजी करण्याचे कौशल्य आहे. बुमराह सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. शमी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्यासाठी सज्ज आणि उत्सुक आहे. मोहम्मद सिराज ऑस्ट्रेलियाचा पाडाव करण्साठी तयार आहे. या सर्व गोलंदाजांमध्ये कांगारुना त्यांच्याच घरात पराभूत करण्याची क्षमता आहे, आणि ते नक्कीच करतील”, असा विश्वासही शास्त्रींनी व्यक्त केला.

मालिकानिहाय वेळापत्रक

एकदिवसीय (वनडे) मालिका

पहिली वनडे – 27 नोव्हेंबर – सिडनी
दुसरी वनडे – 29 नोव्हेंबर – सिडनी
तिसरी वनडे – 1 डिसेंबर – मानुका ओव्हल

टी-20 मालिका

पहिली T20 – 4 डिसेंबर – मानुका ओव्हल
दुसरी T20 – 6 डिसेंबर – सिडनी
तिसरी T20 – 8 डिसेंबर – सिडनी

कसोटी (टेस्ट) मालिका

पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अॅडलेड
दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अॅडलेड
तिसरी टेस्ट – 7 ते 11 जानेवारी – सिडनी
चौथी टेस्ट – 15 ते 19 जानेवारी – ब्रिस्बेन

संबंधित बातम्या :

रोहित-इशांतला संघात घेण्यासाठी बीसीसीआयने कंबर कसली, क्वारंटाईन नियमात सवलतीचे प्रयत्न

India vs Australia 2020 | टीम इंडियाकडे 5 स्टार खेळाडू, कांगारुना त्यांच्याच घरात पराभूत करु, रवी शास्त्रींना विश्वास

india vs australia 2020 australia coach justin langer big statement about team india bowlers