रोहित-इशांतला संघात घेण्यासाठी बीसीसीआयने कंबर कसली, क्वारंटाईन नियमात सवलतीचे प्रयत्न

धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा आणि जलदगती गोलंदाज इशांत शर्मा कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांना मुकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रोहित-इशांतला संघात घेण्यासाठी बीसीसीआयने कंबर कसली, क्वारंटाईन नियमात सवलतीचे प्रयत्न
Follow us
| Updated on: Nov 25, 2020 | 11:39 AM

मुंबई : हिटमॅन रोहित शर्माला (Rohit Sharma) आणि जलदगती इशांत शर्मा या दोन्ही खेळाडूंची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी संघात निवड करण्यात आली आहे. परंतु हे दोन्ही खेळाडू दुखापतग्रस्त होते, त्यामुळे या दोघांचं बंगळुरु येथील एनसीएमध्ये (राष्ट्रीय क्रिकेट अकादमी) फिटनेस ट्रेनिंग सुरु आहे. हे ट्रेनिंग पूर्ण होताच दोघे ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहेत. परंतु रोहित आणि इशांत कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. (INDvsAUS : BCCI Requests CA Quarantine Relaxation to Rohit Sharma, Ishant Sharma before Test Series)

कोरोनाव्हायरसच्या प्रादुर्भावामुळे ऑस्ट्रेलियन सरकारने बनवलेले क्वारन्टाईनसंबंधित नियम आणि सध्याची परिस्थिती पाहता आतापर्यंत दोन्ही खेळाडूंना ऑस्ट्रेलियाला जाण्याची परवानगी मिळायला हवी होती. टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सांगितल्याप्रमाणे दोन्ही खेळाडूंना जास्त दिवस भारतात राहावे लागले तर आपल्या अडचणी वाढू शकतात. ट्रेनिंग पूर्ण करुन दोघे ऑस्ट्रेलियात येणार. त्यानंतर क्वारन्टाईन कालावधी पूर्ण करतील आणि त्यानंतरच दोन्ही खेळाडू कसोटी मालिका खेळण्यासाठी उपलब्ध होतील, असे शास्त्री यांनी सांगितले होते.

रोहित आणि इशांतचं फिटनेस ट्रेनिंग पूर्ण झालेलं नाही. त्यास अजून किती वेळ लागेल याबाबत एनसीएकडून काहीही सांगण्यात आलेले नाही. त्यामुळे कोच रवी शास्त्रींनी व्यक्त केलेली भीती खरी ठरली आहे. रोहित आणि इशांत ऑस्ट्रेलियाला कधी रवाना होणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही. त्यासाठी तीन-चार दिवस किंवा त्याहून अधिक कालावधी लागला तर हे दोन्ही खेळाडू पहिले दोन कसोटी सामने खेळण्यासाठी उपलब्ध नसतील.

दरम्यान, या दोन्ही खेळाडूंना दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळता यावे यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) प्रयत्न सुरु केले आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार BCCI ने क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी (CA) बातचित सुरु केली आहे. दोन्ही खेळाडूंना क्वारन्टाईनसंबंधित नियमांमध्ये सवलत मिळावी, अशी विनंती बीसीसीआयने क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे केली आहे.

BCCI मधील एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने इंडियन एक्सप्रेसने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले आहे. त्यानुसार बीसीसीआय रोहित आणि इशांतला ऑस्ट्रेलियातील क्वारन्टाईनसंबंधित नियमांमध्ये सवलत मिळावी यासाठी प्रयत्न करत आहे. या खेळाडूंना तशी सवलत मिळाली तर दोन्ही खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळू शकतील.

कोरोनाच्या पार्श्वभूमीव ऑस्ट्रेलियन संघाने अनेक नियम जारी केले आहेत. त्यात क्वारन्टाईनचा नियमदेखील आहे. या नियमानुसार कोणत्याही देशातून आलेल्या व्यक्तीला ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यानंतर 14 दिवसांसाठी क्वारन्टाईन राहणं अनिवार्य आहे. ऑस्ट्रेलियात दाखल झालेल्या भारतीय संघाचा आणि आयपीएल खेळून परतलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा क्वारन्टाईन कालावधी उद्या (26 नोव्हेंबर) पूर्ण होणार आहे. या क्वारन्टाईन कालावधित दोन्ही संघांच्या खेळाडूंना सराव करण्याची मुभा देण्यात आली आहे. 27 नोव्हेंबरला उभय संघांमध्ये पहिला एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे.

टीम इंडियाच्या डोकुदुखीत वाढ

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) गर्भवती आहे. पुढील वर्षाच्या जानेवारी महिन्यात अनुष्का शर्मा आणि विराट आई-बाबा होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर विराटने बीसीसीआयकडे पॅटनिर्टी लिव्हसाठी अर्ज केला होता. बीसीसीआयने विराटची रजा मंजूर केली आहे. त्यामुळे विराट टीम इंडियासाठी दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीत खेळताना दिसणार नाही. अशात आता संघातील दोन अनुभवी खेळाडू (रोहित आणि इशांत) पहिले दोन सामने खेळण्यासाठी उपलब्ध नसतील, त्यामुळे कांगारुंविरुद्धची मालिका जिंकण्याचा भारतीय संघाचा प्रवास अजून खडतर होणार आहे. विराट, रोहित, इशांत या अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतीय संघाची संपूर्ण मदार उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजारा या दोघांच्या खांद्यावर असणार आहे.

संबंधित बातम्या

“तर टीम इंडियाला कसोटी मालिकेत 4-0 च्या फरकाने पराभवाला सामोरे जावे लागेल”

‘गब्बर’कडून टीम इंडियाच्या नव्या जर्सीमधील फोटो शेअर, चाहत्यांकडून जुन्या संघाच्या आठवणींना उजाळा

(INDvsAUS : BCCI Requests CA Quarantine Relaxation to Rohit Sharma, Ishant Sharma before Test Series)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.