India vs Australia 2020 | ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत कोणत्याही क्रमांकावर बॅटिंगसाठी तयार : रोहित शर्मा

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेला 17 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.

India vs Australia 2020 | ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत कोणत्याही क्रमांकावर बॅटिंगसाठी तयार : रोहित शर्मा
Follow us
| Updated on: Nov 22, 2020 | 3:43 PM

सिडनी : टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी (India Tour Australia 2020) जय्यत तयारी करतेय. टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय, टी 20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे. या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात 27 नोव्हेंबरपासून होत आहे. हिटमॅन रोहित शर्माला (Rohit Sharma) केवळ कसोटी मालिकेसाठी स्थान देण्यात आलं आहे. रोहित या कसोटी मालिकेच्या दृष्टीने जोरदार सराव करतोय. “मी कसोटी मालिकेत कोणत्याही क्रमांकावर खेळण्यास तयार आहे”, अशी प्रतिक्रिया रोहित शर्माने पीटीआयला दिली आहे. रोहितने मागील 5 कसोटीत टीम इंडियासाठी सलामी दिली आहे. India vs Australia 2020 Hitman Rohit Sharma is ready to bat at any place in the Test series against Australia

“मी तुम्हाला तेच सांगेन जे इतरांना सांगितलंय. टीम मॅनेजमेंट मला ज्या क्रमांकवर खेळवण्यात तयार आहे, त्या क्रमांकावर मी खेळेन. टीम मॅनेजमेंट माझ्या सलामीवीरच्या भूमिकेत बदल करणार की नाही, याबाबत मला माहिती नाही”, असं रोहितने म्हटलं.

विराटच्या अनुपस्थितीत जबाबदारी

“विराटच्या अनुपस्थितीत महत्वाची भूमिका कोण बजावणार , याबाबत संघ व्यवस्थापकांनी नक्कीच निर्णय घेतला असेल. मी ऑस्ट्रेलियात पोहचल्यानंतर सर्व चित्र स्पष्ट होईल. टीम मॅनेजमेंट जसं ठरवेल त्या क्रमांकावर मी फलंदाजी करण्यास तयार आहे”, असं रोहित म्हणाला. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीनंतर मायदेशी परतणार आहे. विराट बाबा होणार आहे. यामुळे विराट पहिल्या कसोटीनंतर भारतात परतणार आहे. त्यामुळे विराटच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारासह रोहितच्या खांद्यांवर महत्वाची जबाबदारी असणार आहे.

रोहित हुक आणि पुल शॉट चांगल्या पद्धतीने खेळतो. “ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांवर चेंडू तितका उसळत नाही, जितकं म्हटलं जातं. पर्थ ग्राऊंडचा अपवाद वगळता गेल्या काही वर्षांमध्ये इतर मैदानांवर (अ‍ॅडिलेड, एमसीजी, एससीजी) चेंडू इतका उसळी घेईल, अस मला वाटतं नाही, असं हिटमॅनने स्पष्ट केलं.

रोहितची आधी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड करण्यात आली नव्हती. मात्र मेडिकल रिपोर्ट्सनंतर रोहितला कसोटी मालिकेसाठी समाविष्ट करण्यात आलं. रोहितने 19 नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलिया दोऱ्यासाठी फिटनेस ट्रेनिंग सुरु केली आहे. रोहित बंगळुरुतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (एनसीए) ट्रेनिंग करतोय.

ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक

एकदिवसीय (वनडे) मालिका

पहिली वनडे – 27 नोव्हेंबर – सिडनी दुसरी वनडे – 29 नोव्हेंबर – सिडनी तिसरी वनडे – 1 डिसेंबर – मानुका ओव्हल

टी-20 मालिका

पहिली T20 – 4 डिसेंबर – मानुका ओव्हल दुसरी T20 – 6 डिसेंबर – सिडनी तिसरी T20 – 8 डिसेंबर – सिडनी

कसोटी (टेस्ट) मालिका

पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अॅडलेड दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अॅडलेड तिसरी टेस्ट – 7 ते 11 जानेवारी – सिडनी चौथी टेस्ट – 15 ते 19 जानेवारी – ब्रिस्बेन

संबंधित बातम्या :

IND vs AUS : कांगारुंविरुद्ध खेळण्यासाठी हिटमॅन सज्ज, टीम मॅनेजमेंटसह चाहते सुखावले

रोहित शर्माला कर्णधारपद न दिल्यास टीम इंडियाचं नुकसान, कोहलीवरील टीकेनंतर गंभीरचा नवा पर्याय

India vs Australia 2020 Hitman Rohit Sharma is ready to bat at any place in the Test series against Australia

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.