रोहित शर्माला कर्णधारपद न दिल्यास टीम इंडियाचं नुकसान, कोहलीवरील टीकेनंतर गंभीरचा नवा पर्याय

रोहितने शर्माला व्हाईट बॉल (मर्यादित षटकांचे क्रिकेट) चे कर्णधारपद न दिल्यास लज्जास्पद ठरेल, असं मत गंभीरने मांडलं

रोहित शर्माला कर्णधारपद न दिल्यास टीम इंडियाचं नुकसान, कोहलीवरील टीकेनंतर गंभीरचा नवा पर्याय
Follow us
| Updated on: Nov 11, 2020 | 11:32 AM

मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) आयपीएलमधील (IPL 2020) कप्तानीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने (Gautam Gambhir) नवा पर्यायही समोर ठेवला आहे. रोहित शर्माला (Rohit Sharma) पूर्णवेळ कर्णधार म्हणून जबाबदारी दिली नाही, तर ते लज्जास्पद असेलच, आणि क्रिकेटचंही दुर्दैव असेल, अशा भावना गंभीरने व्यक्त केल्या. (Gautam Gambhir feels its India’s loss if Rohit Sharma isn’t made white-ball captain)

आयपीएलच्या अंतिम फेरीत मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून रोहितने ट्रॉफी उंचावल्यानंतर गंभीर ‘ईएसपीएन क्रिकइन्फो’ टी20 टाईम आऊटमध्ये गंभीर काल बोलत होता. मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) दिल्ली कॅपिटल्सवर (Delhi Capitals) आयपीएल 2020 च्या अंतिम सामन्यात (IPL 2020 Final) पाच विकेट्सने शानदार विजय मिळवला. रोहित शर्मा मुंबईच्या विजयाचा शिल्पकार ठरला. रोहितने 51 चेंडूत 5 फोर आणि 4 सिक्ससह 68 धावांची विजयी खेळी केली.

“जर रोहित शर्मा भारताचा कर्णधार झाला नाही, तर ते रोहितचं नाही, तर भारतीय क्रिकेट संघाचं नुकसान असेल. एक कर्णधार त्याच्या संघाइतकाच चांगला असावा लागतो, याच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. परंतु कोण चांगला कर्णधार आणि कोण चांगला नाही, याबद्दल  न्यायनिवाडा करण्यासाठी कोणती मापदंड आहेत? पॅरामीटर्स आणि बेंचमार्क समान असले पाहिजेत. रोहितच्या नेतृत्वात त्याच्या संघाने पाच आयपीएल विजेतेपदं पटकावली आहेत” असं गंभीर म्हणाला.

गंभीर काय म्हणाला होता?

“आर अश्विनचं काय झालं बघा… दोन वर्ष तो किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार होता, रिझल्ट्स मिळाले नाहीत, त्याला हटवलं. आपण एमएस धोनीबद्दल बोलतो, आपण रोहित शर्माबद्दल बोलतो. धोनीने तीन वेळा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या गळ्यात चार वेळा जेतेपदांची माळ पडली आहे. त्यांनी स्वतःला सिद्ध केल्यामुळे ते इतकी वर्ष कर्णधारपदी कायम आहेत. रोहित शर्माने आठ वर्षात एकदाही आयपीएल जिंकली नसती, तर त्याला हटवलं असतं. वेगवेगळ्या व्यक्तींसाठी मोजमापाची वेगवेगळी परिमाणं नसावीत” असं गंभीर आयपीएलच्या अंतिम फेरीपूर्वी म्हणाला होता.

“धोनी सर्वात यशस्वी कर्णधार का?”

“आपण म्हणत राहतो, की एमएस धोनी (MS Dhoni) हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे… का? कारण त्याने दोन विश्वचषक आणि तीन आयपीएल जिंकले आहेत. पण रोहितने पाच आयपीएल विजेतेपदं जिंकली आहेत. तो या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याला व्हाईट बॉल (White Ball Cricket – मर्यादित षटकांचे क्रिकेट) किंवा किमान टी -20 चे कर्णधारपद न दिल्यास लज्जास्पद  ठरेल. तो केवळ कर्णधारपदी असताना संघाला विजयासाठी मदत करु शकतो. त्यामुळे जर तो भारताचा नियमित व्हाईट बॉल कर्णधार झाला नाही, तर ते टीमचं नुकसान असेल” याकडे गंभीरने काल बोलताना लक्ष वेधलं.

“भारताने कर्णधारपद विभागून देण्याचाही विचार करावा. विराट कोहलीकडे कसोटी, तर रोहित शर्माकडे वन डे आणि टी20 सामन्यांचं कर्णधारपद सोपवण्याचा पर्यायही आहे. एकाने कर्णधार म्हणून पाच जेतेपदं पटकावली आहेत, तर दुसऱ्याने एकही नाही. कोहली हा वाईट कर्णधार आहे, असं मी म्हणणार नाही. पण दोघांनाही समान व्यासपीठ मिळालं. त्यामुळे दोघांना जज करण्यासाठी एकच पॅरामीटर लावता येईल” असं गौतम गंभीरला वाटतं. (Gautam Gambhir feels its India’s loss if Rohit Sharma isn’t made white-ball captain)

हेही वाचा : अश्विनला दोन वर्षात हटवलं, एकही ट्रॉफी न जिंकता कोहली आठ वर्ष कर्णधार का? : गंभीर

2012 आणि 2014 मध्ये गंभीरच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) दोनवेळा आयपीएल विजेतेपद मिळवली आहेत. 2013 मध्ये कोहलीने त्या वर्षीच्या हंगामातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या (Royal Challengers Bangalore) कर्णधारपदाची सूत्रे डॅनियल व्हेटोरीकडून घेतली होती, तर रिकी पॉन्टिंगने खराब कामगिरीनंतर रोहित शर्माला नेतृत्वाची जबाबदारी दिली होती.

संबंधित बातम्या :

भावा जिंकलास ! ‘हिटमॅन’ रोहित शर्मा, आयपीएलच्या इतिहासातील यशस्वी खेळाडू आणि कर्णधार

विजेत्या मुंबई इंडियन्ससह टॉप 4 संघ मालामाल

ऑरेंज कॅप मिळवण्याची ‘गब्बर’ संधी हुकली, केएल राहुलला ऑरेंज कॅपचा मान

(Gautam Gambhir feels its India’s loss if Rohit Sharma isn’t made white-ball captain)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.