India vs England 1st T20I | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड आमनेसामने, कोण वरचढ कोण कमजोर?

| Updated on: Mar 12, 2021 | 3:29 PM

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (india vs england 1st T20I) यांच्यात आतापर्यंत एकूण 14 टी 20 सामने खेळवण्यात (head to head records) आले आहेत.

India vs England 1st T20I | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड आमनेसामने, कोण वरचढ कोण कमजोर?
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (india vs england 1st T20I) यांच्यात आतापर्यंत एकूण 14 टी 20 सामने खेळवण्यात (head to head records) आले आहेत.
Follow us on

अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात आज (12 मार्च) संध्याकाळी टी 20 मालिकेतील (India vs England 1st T20I) पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्याचं आयोजन अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium Ahmedabad) करण्यात आले आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस उडवण्यात येणार आहे. टीम इंडियाच्या नेतृत्वाची धुरा विराट कोहलीच्या (Virat Kohli) खांद्यावर असणार आहे. तर इंग्लंडच्या कर्णधारपदाची जबाबदारी इयॉन मॉर्गनकडे (Eoin Morgan) असेल. (india vs england 1st T20I head to head records)

टी 20 वर्ल्ड कपची रंगीत तालिम

उभय संघातील ही मालिका आगामी टी 20 वर्ल्ड कपच्या दृष्टीने महत्वाची असणार आहे. या मालिकेतील कामगिरीच्या जोरावर प्रत्येक खेळाडूचा वर्ल्ड कप स्पर्धेसाठी विचार केला जाऊ शकतो. त्यामुळे संबंधित खेळाडूची कामगिरी ही महत्वपूर्ण ठरणार आहे. यामुळे प्रत्येक खेळाडूचा चांगली कामगिरी करण्याचा मानस असणार आहे.

दोघांपैकी वरचढ कोण?

आतापर्यंत उभयसंघात एकूण 14 टी 20 सामने खेळवण्यात आले आहेत. यापैकी उभयसंघांनी प्रत्येकी 7 मॅचेस जिंकल्या आहेत. यामुळे दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. यामुळे या दोन्ही संघात ‘काटे की टक्कर’ असणार आहे.

टीम इंडियाचं यावर असणार लक्ष

ही मालिका जिंकून टीम इंडियाला सलग 6 वी टी 20 सीरिज जिंकण्याची संधी असणार आहे. त्यामुळे ही मालिका जिंकण्याचा प्रयत्न विराटसेनेचा असेल. तसेच भारताला टी 20 रॅंकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहचण्याची संधी आहे. 5 सामन्यांची मालिका 4-1 किंवा 5-0 ने जिंकल्यास रॅंकिंगमध्ये टीम इंडिया अव्वल क्रमांकावर पोहचेल. त्यामुळे ही मालिका टीम इंडियासाठी महत्वपूर्ण असणार आहे. त्यामुळे या संपूर्ण मालिकेत भारतीय संघाच्या कामगिरीकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असमार आहे.

इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी टीम इंडिया : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिषभ पंत(यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दिपक चहार, नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकूर.

अशी आहे इंग्लंड टीम : इयन मॉर्गन (कॅप्टन), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेयरस्टो, सॅम बिलींग्ज, जोस बटलर, सॅम करन, टॉम करन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिंग्विनस्टोन, डेविड मलान, आदिल राशिद, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रिस टोपेल आणि मार्क वुड.

संबंधित बातम्या :

IND vs ENG 1st T20 Live Streaming : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पहिली टी 20 मॅच लाईव्ह स्ट्रीमिंग, कधी आणि कुठे?

IND vs ENG 1st T20 | के एल राहुल की शिखर धवन, हिटमॅन रोहित शर्मासोबत ओपनिंगला कोण उतरणार? विराटने दिलं उत्तर

(india vs england 1st T20I head to head records)